सुशांतच्या मृत्यूपूर्वी घराचे दिवे बंद झाले : रिया शवागर पोहोचली कशी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2020
Total Views |
sushant singh rajput_1&nb
 
 
मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयचा तपास गेल्या काही दिवसांपासून वेगाने सुरू आहे, त्यात आता आणखी महत्वाचे खुलासे केले जात आहेत. या सर्व प्रकरणाकडे सीबीआयची मुंबईतील टीम बारीक लक्ष ठेवून आहे, अशातच सुशांतचे शेजारी पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर आले आहेत.
 
 
घरचे दिवे इतक्या लवकर बंद का झाले ? 
 
वांद्रे येथील ज्या घरात सुशांतचा मृतदेह लटकलेला आढळला होता. त्याच्या शेजाऱ्यांनी नवा खुलासा केला आहे. १३ जूनच्या रात्री १०.३०-१०.४५ वाजता सुशांत सिंह राजपूतच्या घरातील दिवे बंद झाले. किचनमधून फक्त प्रकाश दिसत होता. सुशांतच्या इमारतीत राहणाऱ्या महिलेने शनिवारी याबद्दल माहिती दिली आहे.
 
 
फक्त किचनमध्ये सुरू होते दिवे 
 
त्या म्हणाल्या, यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. सुशांतच्या घरातील दिवे १०.३०-१०.४५ वाजताच्या दरम्यान बंद झाले. सुशांतच्या घरातील दिवे रात्री उशीरापर्यंत सुरू होते. मात्र, त्या दिवशी किचन सोडून सर्व ठिकाणचे दिवे सुरू होते. बाकी सर्व दिवे बंद करण्यात आले होते. तसेच १३ जूनला कुठलीही पार्टी झालीच नाही, असाही दावा त्यांनी केला आहे.


पार्टी झालीच नाही पण... 
 
 
त्या म्हणाल्या, "कुठलीही पार्टी झाली नाही. मात्र, इतक्या लवकर दिवे बंद झाल्याने माझ्या मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचूकली होती." सुशांतच्या मृत्यूप्रकरणानंतर आता सुशांतच्या आत्महत्येची घटना रिक्रिएट केली जात आहे. फॉरेन्सिक टीम हा तपास करत आहे.

 
फॉरेन्सिक टीमने आणल्या सात गाड्या 
 
 
सीबीआय आणि फॉरेन्सिक विशेषक शनिवारी दुपारी अडीच वाजता वांद्रे येथील मों ब्लां अपार्टमेंट येथे पोहोचले. सुशांतच्या मृत्यूचे कारण आणि पुरावे शोधण्यासाठी हा तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. केंद्रीय फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेतील विशेषकांनी सातहून अधिक गाड्या यावेळी तपासासाठी आणल्या होत्या.
 

स्वयंपाकी आणि सिद्धार्थ पिठाणीचीही चौकशी  
 
सुशांतच्या स्वयंपाकी आणि फ्लॅटमध्ये त्याच्यासोबत राहणारा सिद्धार्थ पिठाणी यांनाही यावेळी सोबत आणण्यात आले होते. पिठाणीची सीबीआय चौकशी केली जात असून त्याचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. सीबीआयचे दूसरे पथक कूपर रुग्णालयात पोहोचले शनिवारी रुग्णालयाच्या डीनला भेट दिली. त्यांनी सुशांतचे पोस्टमार्टम करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली आहे.


शवविच्छेदन इतक्या घाईत का केले ? 


सुशांतचे अॅटोप्सी रिपोर्ट आणि शवविच्छेदन इतक्या घाईत का केले, असा प्रश्न विचारण्यात आल्यावर रुग्णालयाने मुंबई पोलीसांचे नाव पुढे केले आहे, पोलीसांनीच तातडीने अहवाल मागवल्यानेच शवविच्छेदन घाईघाईत केले आणि त्यामुळेच अॅटोप्सी रिपोर्टमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.
 

४५ मिनिटे शवागरात रिया काय करत होती ? 


 
कुपर रुग्णालयाच्या शवागरात रिया पोहोचली असल्याचा धक्कादायक खुलासाही या प्रकरणातून झाला आहे. रियाच्या शवागारात जाण्यावरून उपस्थित झाले होते प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येण्यापूर्वी रिया चक्रवर्तीही १५ जूनला रुग्णालयाच्या शवागरात गेली. तिथे ती जवळपास ४५ मिनिटे होती. रुग्णालय आणि मुंबई पोलीसांनी तिला जाऊ कसं दिलं हा प्रश्न विचारला जात आहे. रिया कुटूंबातील सदस्य नाही. आत्महत्येचे प्रकरण असताना रियाला आत जाऊ कुणी दिले असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
 
 

रिया शवागरात 'सॉरी बाबू' का म्हणाली ?
 
रिया शवागरात केल्यानंतर सुशांत सिंहच्या मृतदेहावर हात ठेवून 'सॉरी बाबू', असे वाक्य पुटपुटल्याचे तिथे उपस्थित सुरजीत सिंह राठोड यांनी म्हटले आहे. ही आत्महत्या नाही, सुशांत सिंहने आत्महत्या केली नसून त्याला गळा आळवल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या प्रकरणावरून पुन्हा रियाच्या भूमीकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. 



@@AUTHORINFO_V1@@