'कोविशील्ड'बाबतचे वृत्त ; सिरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2020
Total Views |

serum institute_1 &n



नवी दिल्ली :
कोरोनावर पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने ‘कोविशिल्ड’ लस शोधून काढली असून, त्या लसीच्या उपलब्धतेविषयी काही माध्यमांनी वृत्त प्रसिद्ध केले होते. ते वृत्त सिरम इन्स्टिट्यूटनने फेटाळून लावले आहे. ‘कोविशिल्ड’ लसीच्या उपलब्धतेविषयी जे वृत्त काही माध्यमांनी दिले, ते खोटे असून अंदाजाने दिले असल्याचे सिरम इन्स्टिट्यूटने स्पष्ट केले आहे.



संपूर्ण जगभरात कोरोनावर लस शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. अशातच भारतानेदेखील लसीच्या चाचणी करण्यात आघाडी घेतली आहे. देशात कोरोनाच्या नियंत्रणाबरोबरच त्यावर लस शोधण्याचे काम सुरू आहे. यात सिरम इन्स्टिट्यूटला यश आले असून, ‘कोविशिल्ड’ लसीच्या सध्या चाचण्या सुरू आहेत. मात्र, चाचण्या सुरू असतानाच ही लस ७३ दिवसांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. हे वृत्त सिरम इन्स्टिट्यूटनं फेटाळून लावले आहे.



एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ७३ दिवसांत करोनावर लस उपलब्ध होणार असल्याच्या वृत्तावर सिरमने स्पष्टीकरण दिले आहे. “‘कोविशिल्ड’च्या उपलब्धतेविषयी माध्यमांमध्ये सध्या जे दावे केले जात आहेत, ते पुर्णपणे खोटे व अंदाजावर आधारित आहेत. सध्या केंद्र सरकारने आम्हाला फक्त लस तयार करण्याची परवानगी आणि भविष्यातील वापरासाठी ती साठवून ठेवण्याची परवानगी दिली आहे. कोविशिल्डच्या सर्व चाचण्या एकदा यशस्वी झाल्या आणि आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर ही लस विक्रीसाठी उपलब्ध होईल. ऑक्सफोर्ड-अँस्ट्राजेनेका लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. लस रोगप्रतिकारक आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर सिरम इन्स्टिट्यूट त्यांच्या उपलब्धतेविषयी अधिकृतपणे माहिती देईल,” असेही सिरमने म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@