दिल्लीतील संशयित अतिरेक्याच्या घरातुन स्फोटकांचा मोठा साठा जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2020
Total Views |

isis_1  H x W:
लखनऊ : दिल्लीत काल,२३ ऑगस्ट रोजी पकडलेला आयसीसशी संबंधित संशयित अतिरेकी अबू युसूफ याचा घातपाताचा मोठा कट असल्याचे आता समोर आले आहे. उत्तर प्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) अबू युसूफच्या बलरामपूर येथील घरी छापा टाकला. यावेळी एटीएसला त्याच्या घरी स्फोटकांचा मोठा साठा मिळाला. हा साठा बघून एटीएसचे अधिकारीदेखील स्तब्ध झाले.





एटीएसने टाकलेल्या छाप्यात अबू युसूफच्या घरात बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे स्फोटके मिळाली. पोलिसांनी सर्व स्फोटके आणि बऱ्याच वस्तू जप्त केल्या आहेत. एटीएस आणि दिल्ली पोलिसांकडून अबू युसूफची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अबू युसूफचे वडील कफील अहमद यांच्यासह आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे.दरम्यान, अबू युसूफचे कारस्थान उघड झाल्यानंतर त्याची पत्नी आणि वडिलांनी बलरामपूर येथे ‘एएनआय’ वृतसंस्थेला प्रतिक्रिया दिली होती. “माझ्या मुलाने असं कृत्य केलं, या गोष्टीचं मला प्रचंड वाईट वाटतंय. शक्य झाल्यास युसूफला एकदा माफी मिळावी, पण त्याने जे कृत्य केलंय ते प्रचंड वाईट आहे. तो इतक्या अमानूष कृत्याच्या कामाला लागलाय याबाबत मला माहित पडलं असतं तर मी त्याला घर सोडून जायला सांगितलं असतं”, असे युसुफच्या वडिलांनी सांगितले. तर “तो घरात गन पावडर आणि इतर साहित्याचा साठा करत होता. जेव्हा मी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने मला यामध्ये पडू नकोस असं म्हटलं. त्याला एकदा माफी मिळावी, अशी माझी इच्छा आहे.'' असे त्याची पत्नी म्हणाली.
@@AUTHORINFO_V1@@