हे अशक्य का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2020
Total Views |

bmc_1  H x W: 0



जागतिक आरोग्य संघटनेने मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची दखल घेतली आहेत. जागतिक दर्जाच्या‘वॉशिंग्टन पोस्ट’नेही कौतुक केले आहे, तर फिलिपिन्सची राजधानी मनिलामध्येही ‘धारावी पॅटर्न’ राबविण्यात येणार आहे. यापूर्वी मुंबई जगाचे मार्गदर्शन घेत होती आणि आता मुंबई जगाला मार्गदर्शक ठरत आहे, असे आयुक्त चहल यांनी म्हटले आहे. मात्र, धारावीचा समावेश असलेल्या ‘जी/साऊथ’ विभागात दादर आणि माहिमचाही समावेश आहे. तेथे कोरोनावर नियंत्रणत मिळविण्यात पालिकेला अद्याप यश आलेले नाही. यामागचे निश्चित कारण काय? पालिकेच्या आरोग्य यंत्रणेला हे शक्य का होत नाही, हे एक कोडेच आहे.



जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनाने जगभरात २,२८,६२,६४५ जण बाधित झाले. ७,९७,११७ जणांचा मृत्यू झाला, तर १,५५,१७,६९४ जण कोरोनामुक्त झाले. सध्या जगभरात ६५,४७,६४५ रुग्ण उपचार (अ‍ॅक्टिव्ह) घेत आहेत. भारताचा विचार केल्यास २९,०५,८२३ जण बाधित झाले, तर ५४,९७५ जणांचा मृत्यू झाला. २१,५८,९४६ जण ‘रिकव्हर’ झाले, तर २२,१३,९२१ उपचार घेत आहेत. महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या ६,४३,२८९असून, २१,३५९ जणांचा मृत्यू झाला आहे. ४,५९,१२४ जण बरे होऊन घरी गेले असून १,६२,४९१ जण ‘अ‍ॅक्टिव्ह’ आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईचा विचार केला तर मुंबईची एकूण रुग्णसंख्या १,३२,८१७ झाली आहे. त्यापैकी १,०७,०३३ जण बरे झाले असून ७,३११ जणांचा मृत्यू झाला आहे आणि सध्या 18,170 जण ‘अ‍ॅक्टिव्ह’ आहेत. मुंबई ही देशाची राजधानी आहे. सव्वा कोटी लोक दाटीवाटीने राहत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग जलद होतो आणि बाधितांची संख्या वाढते. मात्र, धारावीच्या बाधितांनी आणि बरे झालेल्या रुग्णसंख्येने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. धारावीची एकूण रुग्णसंख्या २ ,६९७ झाली असून २,३४२ जणांना ‘डिस्चार्ज’ देण्यात आला आहे, तर केवळ ९५ रुग्ण ‘अ‍ॅक्टिव्ह’ आहेत. दररोज आढळणारी रुग्णसंख्या ९० वरून सध्या दररोज पाच-सहा रुग्णांपर्यंत मर्यादित आली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या आणि दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टीत कोरोना एवढ्या लवकर नियंत्रणात आल्यामुळे जगात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची दखल घेतली आहेत. जागतिक दर्जाच्या‘वॉशिंग्टन पोस्ट’नेही कौतुक केले आहे, तर फिलिपिन्सची राजधानी मनिलामध्येही ‘धारावी पॅटर्न’ राबविण्यात येणार आहे. यापूर्वी मुंबई जगाचे मार्गदर्शन घेत होती आणि आता मुंबई जगाला मार्गदर्शक ठरत आहे, असे आयुक्त चहल यांनी म्हटले आहे. मात्र, धारावीचा समावेश असलेल्या ‘जी/साऊथ’ विभागात दादर आणि माहिमचाही समावेश आहे. तेथे कोरोनावर नियंत्रणत मिळविण्यात पालिकेला अद्याप यश आलेले नाही. यामागचे निश्चित कारण काय? पालिकेच्या आरोग्य यंत्रणेला हे शक्य का होत नाही, हे एक कोडेच आहे.



शहाणपण देगा देवा


कोरोना या जागतिक महामारीने सगळ्यांनाच एका पातळीत आणून ठेवले आहे. परमेश्वराला सर्वजणसारखे असतात. पण मनुष्यप्राणी प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे मान देत असतो. मात्र, कोरोनाने हे सगळे भेदभाव मिटवून टाकले आहेत. जातीजातीतले, धर्माधर्मातले भेदभावही मिटवून टाकले आणि सर्वांना एकाच पातळीत आणून ठेवले. कोरोना हा आजार व्यक्ती-व्यक्तीच्या संपर्कातून संसर्ग होत समुदायातून जास्त पसरतो. त्यामुळे समुदायाने साजरे होणार्‍या सणांवर अंकुश ठेवण्यात आले आहेत. गर्दीचा पहिला सण दहिकाला साजरा झालाच नाही. आता गणेशोत्सवही साध्या पद्धतीने साजरा होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोणताही झगमगाट न करता छोट्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला हे चांगलेच झाले. खरे तर गणेशोत्सव घराघरात साजरा व्हायचा, पण सांघिक ऐक्यासाठी आणि स्वातंत्र्यलढ्याच्या जगजागृतीसाठी लोकमान्य टिळकांनी घरातला गणपती चौकात आणला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही राजकीय पक्षांमुळे गणेशोत्सवात दांभिकपणा अधिक शिरला आणि या उत्सवाचे मूळ स्वरूपच बाजूला सरले. या उत्सवातला भक्तिभाव लोप पावला आणि दिखाऊपणा अधिक जाणवू लागला. अवाढव्य मंडपांमुळे वाहतुकीला अडथळा, भव्य मूर्तीमुळे मांगल्याला बाधा, धांगडधिंग्यामुळे वस्तीवस्तीत गजबजाट, त्यासाठी वर्गणीच्या नावाखाली सामान्य लोकांना धाकदपटशा आणि ध्वनिवर्धकामुळे होणारे ध्वनिप्रदूषण यामुळे हा उत्सव नको, असे सर्वसामान्यांना वाटू लागले. पण, हे शक्य होत नव्हते. मात्र, कोरोना या अदृश्य विषाणूने पृथ्वीतलावर उत्पात माजवला. रावापासून रंकापर्यंत सर्वांना हैराण करून सोडले आणि सर्वांना एकाच पातळीत आणून ठेवले. त्यामुळे सर्वाना शहाणपण सुचले. आज गणेशोत्सवाला सुरुवात होत असताना त्यातील स्पर्धाच नाहीशी झाल्याचे जाणवत असून सारेजण गणरायाच्या चरणी भक्तिभावाने लीन होत असल्याचे जाणवत आहे. शोभेच्या मूर्ती बाद झाल्या असून अनेक मंडळांतर्फे पूजेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. अनेकांनीु ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. शहरातल्या सार्वजनिक मंडळांनीसुद्धा ‘एक प्रभाग, एक गणपती’ संकल्पना राबविण्यास हरकत नसावी. महाराष्ट्र शासनाने त्यासाठी नियमावली तयार करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.

- अरविंद सुर्वे
@@AUTHORINFO_V1@@