खड्ड्यात कागदी नौका सोडत ठाण्यात भाजपाचे आंदोलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2020
Total Views |

BJP Thane_1  H
 
ठाणे : ठाणे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना सत्ताधारी शिवसेना व महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत, भाजपाने शहरातील विविध ठिकाणी आंदोलन केले. खड्यात कागदी नौका सोडण्याबरोबरच मासेमारीसाठी गळ टाकण्याबरोबरच विविध ठिकाणी खड्डे भरण्यात आले. या वेळी सत्ताधारी शिवसेनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
 
 
मॉडेला चेकनाका येथे झालेल्या मुख्य आंदोलनात आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्याबरोबरच प्रदेश चिटणीस संदीप लेले, नगरसेवक सुनेश जोशी, भाजपाचे शहर उपाध्यक्ष सचिन मोरे, विजय त्रिपाठी, भूषण पाटील, सुनिल कोळपकर आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. मॉडेला चेकनाक्याबरोबरच गटनेते संजय वाघुले यांनी ओवळा नाका, नगरसेविका स्नेहा आंब्रे यांनी मानपाडा, नगरसेवक मिलिंद पाटणकर, वैभव साटम यांनी कॅसल मिल, लोकमान्य नगर, दिवा येथे आंदोलन करण्यात आले. तसेच या भागातील खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
 
गौरी-गणपतीपूर्वी खड्डे भरणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. मात्र, आता गणपतीचे खड्ड्यातूनच आगमन करण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमध्ये रस्ते दुरुस्ती करण्याची वेळ असताना, केवळ टक्केवारीसाठी पावसाळ्यात खड्ड्यांचे जाळे पसरण्याची वाट सत्ताधारी शिवसेनेने पाहिली, असा आरोप आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी दिला. सध्या अयोग्य पद्धतीने खड्डे बुजविले जात असून, वाहने घसरत आहेत. योग्य पद्धतीने खड्डे न बुजविल्यास भाजपातर्फे तीव्र आंदोलन करून सत्ताधाऱ्यांना घराबाहेर पडू देणार नाही, असा इशारा आमदार डावखरे यांनी दिला.
 
गोल्डन गॅंग व ठेकेदाराच्या अभद्र युतीमुळे गेल्या २५ वर्षांपासून ठाणेकरांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेबरोबरच एमएसआरडीसी व पीडब्ल्यूडीचेही रस्ते उखडले आहेत. केवळ सत्ताधारी व कंत्राटदारांच्या संबंधांमुळे रस्त्याच्या निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत, असा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला. भाजपाचे महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली ओवळा नाका येथे आंदोलन झाले. या आंदोलनात नगरसेविका अर्चना मणेरा, सरचिटणीस विलास साठे, डॉ. किरण मणेरा, राम ठाकूर आदी सहभागी झाले होते. कॅसल मिल येथे नगरसेवक मिलिंद पाटणकर, सरचिटणीस कैलास म्हात्रे, वैभव साटम यांनी, मानपाडा येथे नगरसेविका स्नेहा आंब्रे यांनी, दिवा येथे भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांनी आंदोलन करीत सत्ताधारी शिवसेना व महापालिका प्रशासनाचा निषेध केला.
 
 
@@AUTHORINFO_V1@@