दिलासादायक : एका दिवसात ५८ हजारांहून अधिक कोरोनारुग्ण ठणठणीत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2020
Total Views |

Corona_1  H x W



रुग्ण बरे होण्याचा दर ७४ टक्क्यांच्या घरात


नवी दिल्ली : गेल्या २४ तासात देशभरात ५८ हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त ठणठणीत झाले आहेत, तर रुग्ण बरे होण्याचा दर आता ७४ टक्क्यांच्या घरात गेला आहे. आतापर्यंत एकुण २१ लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत आणि मृत्यूदर घटून १.८९ टक्के झाला आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात ५८ हजार ७९४ रुग्ण ठणठणीत झाले, ६९ हजार ६५२ नवे रुग्ण आढळून आले. तर, ९७७ मृत्यू झाले आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांची एकुण संख्या २८ लाख ३६ हजार ९१६ एवढी झाली असून, त्यापैकी २० लाख ९६ हजार ६६४ रुग्ण बरे झाले आहेत. तर, ६ लाख ८६ हजार ३९५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ७३.९१ टक्के झाला आहे. तर, मृत्यूदरात घट होऊन १.८९ टक्के झाला आहे. विशेष बाब म्हणजे बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा १४ लाख १० हजार २६९ ने जास्त आहे.


आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात ९ लाखांहून अधिक म्हणजे ९ लाख १८ हजार ४७० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या एकुण चाचण्यांची संख्या ३ कोटी २६ लाख ६१ हजार २५१ एवढी झाली आहे. त्याचप्रमाणे प्रति दहा लाख लोकसंख्येमागे सध्या २३ हजार ६६८ चाचण्या करण्यात येत आहेत. देशात सध्या ९७७ सरकारी आणि ५१७ खासगी अशा एकुण १ हजार ४९४ प्रयोगशाळा कार्यरत आहेत.




@@AUTHORINFO_V1@@