‘मास्क आझादी’चे कोविडखुळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Aug-2020   
Total Views |
on Freedom from Mask move




काही कोविडखुळ्या भारतीय तरुणांनी मास्कपासून ‘आझादी’ची ऑनलाईन मोहीम सुरु केली. मोहिमेचे नावही काय तर म्हणे, ‘मास्क से आझादी.’ आता या मोहिमेचे उगमस्थान पश्चिमी देशांतले हे वेगळे सांगायला नकोच. पण, जे पाश्चिमात्त्य तेच योग्य, याच किडक्या विचारसरणीची ही आणखीन एक उपज. हल्ली ‘आझादी’ हा शब्द ऐकल्यानंतर देशप्रेम, राष्ट्रभक्तीच्या जाज्वल्य भावनांऐवजी साशंकताच मनात व्यापून जाते. कारण, या पवित्र शब्दाला त्याच्या मागेपुढे काहीही जोडून सर्रास ‘आझादी’चे नारे बुलंद केले जातात. हक्क, अधिकारांची घसा फाडून मागणी केली जाते. पण, ‘आझादी’वाले हेच मात्र सपशेल विसरतात की, ते आज आझादही आहेत आणि म्हणूनच या देशात आबाद आहेत. पण, आता काही कोविडखुळ्या भारतीय तरुणांनी मास्कपासून ‘आझादी’ची ऑनलाईन मोहीम सुरु केली. मोहिमेचे नावही काय तर म्हणे, ‘मास्क से आझादी.’ आता या मोहिमेचे उगमस्थान पश्चिमी देशांतले हे वेगळे सांगायला नकोच. पण, जे पाश्चिमात्त्य तेच योग्य, याच किडक्या विचारसरणीची ही आणखीन एक उपज. मास्कला अमेरिकेत आणि युरोपीय देशांतही काही आत्मकेंद्री नागरिकांनी विरोध दर्शविला. मास्क घालणे म्हणजे आमच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर हा सरकारचा हल्ला आहे. सरकार आम्हाला नियंत्रित करु पाहतंय. आमची ‘आझादी’ धोक्यात आहे वगैरे वगैरे भूमिका तिथे तावातावाने मांडल्या गेल्या. पण, एकूणच पाश्चिमात्त्य संस्कृतीतील हा ‘लिबरल कहर’ पाहता, हे तसे अपेक्षितच. म्हणून मग भारतातही याचेच अंधानुकरण करत काही कोविडखुळी डोकी एकत्र आली. आपल्या फराटेदार इंग्रजीतून या तरुणांनी मास्क कसे आरोग्यासाठी अपायकारक आहेत, शरीरातून बाहेर पडणारा कार्बनडाय ऑक्साईड कसा मास्कमध्येच राहिल्यामुळे हानिकारक आहे वगैरे नसते सल्ले दिले. पण, मूळ मुद्दा आरोग्याचा नव्हताच. आक्षेप हाच की, आज हे सरकार मास्कची सक्ती लादतयं, उद्या डिजिटल आयडी आणि मग आणखीन कशाची सक्ती करेल. तेव्हा, मास्क वापरुन सरकारची कठपुतळी होऊ नका. मास्क वापरणे हे गुलामगिरीचे प्रतीक आणि ‘आझादी’ची तर कुर्बानीच! आता एवढ्यावर ही वायफळ बडबड करुन हे शहरी तरुण थांबले नाहीत, तर एका कढईत मास्क एकत्र करुन त्यांनी जाळण्याचाही ‘स्टंट’ केला. त्याला नाव ‘मास्क जलाओ अभियान.’ सोशल मीडियावर लगोलग हा व्हिडिओ व्हायरल करत भारतीयांनाही मास्कमुक्तीचे आणि मास्कच्या या जोखळदंडातून सुटकेचे आवाहन करण्यात आले. सरकारविरोधी रोषनिर्मितीचे हे अभियान आझादी, लिबरल, तुकडे-तुकडेवाल्या डाव्या गँगच्या सडक्या देशविरोधी मोहिमेचाच तर भाग नाही ना, या संशयाला इथेही वाव आहे.
 
 

मास्क हैं तो मुमकीन हैं।

 
 
 
‘कोविड-19’चा अस्त जेव्हा व्हायचा तेव्हा होईलच, पण तोपर्यंत घराबाहेर हा मास्क तुमचा-आमचा कोविडसोबतीच. जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत आणि कोरोनापश्चातही मास्क हा मानवी जीवनशैलीचा एक अविभाज्य घटक असेल, यात शंका नाही. मास्कच्या उपयोगितेची उजळणी करण्याची गरज नाही. कारण, गेल्या पाच-सहा महिन्यांपासून त्याचा कसा, कुठे वापर करावा, त्याची विल्हेवाट कशी लावावी, या सगळ्याशी आपण सुपरिचित आहोत. जागतिक आरोग्य संघटनेनेही मास्कच्या उपयोगितेवर वेळोवेळी शिक्कामोर्तब केले आहे. परिणामी, भारतासह कित्येक देशांमध्ये घराबाहेर पडल्यानंतर मास्क वापरणे बंधनकारक आहे. असे असतानाही अमेरिकेसह काही युरोपीय देशांमध्ये मास्कच नाही तर ‘लॉकडाऊन’विरोधातही जनतेचा रोष उफाळून आला. दुकानांची तोडफोड झाली. लुटमारीने व्यवसायांना अधिक विकलांग केले. पण, सुदैवाने भारतात या देशांपेक्षा अधिक गरिबी, बेकारी, आर्थिक चणचण असूनही अशी परिस्थिती उद्भवली नाही. लोकांनी संयम बाळगला. एकतेचे प्रदर्शन केले. हीच मुळात काही लोकांची पोटदुखी. ज्याप्रमाणे पाश्चिमात्त्य देशांत लोकांनी रस्त्यावर उतरुन त्यांच्या सरकारविरोधात निदर्शने केली, रस्त्यावर धुडगूस घातला, तसेच काही तरी भारतातही घडवून आणण्याचे षड्यंत्र पडद्यामागे रचले जात आहे. काँग्रेससह डाव्या नेत्यांची या काळातील सरकारविरोधी विधाने आणि भूमिकांवर एक नजर टाकली तरी याची कल्पना यावी. त्यातच राम मंदिराचे भूमिपूजन असेल अथवा काश्मीरमधून कलम 370 हटविण्याची वर्षपूर्ती, असा चहुकडून मोदी सरकारला घेरण्याचा फुसका प्रयत्नही झाला. पण, मोदी-शाहंच्या रणनीतीने या षड्यंत्राची हवाच काढली. इतकेच नव्हे तर एका सर्वेक्षणाने देशाच्या जनतेचा मोदी सरकारवरच पूर्ण विश्वास असल्याचेही दाखवून देत विरोधकांना जोरदार चपराक लगावली. शाहीनबागेतील काही आंदोेलकांचा भाजपप्रवेश तर या सगळ्याचा कळस ठरावा. पण, म्हणून हे देशविरोधी कारनामे थांबतील, अशा भाबड्या आशावादात कोणी राहू नये. ‘मास्क से आझादी’ हा याच मोहिमेचा एक लहानसा भाग असू शकतो. मास्कला विरोध म्हणजे सरकारला विरोध म्हणजेच मोदीविरोध हे समीकरण तरुणांच्या गळी उतरवण्याचा हा केविलवाणा प्रयत्नच म्हणावे लागेल. तेव्हा लक्षात घ्या, मास्क हैं तो कोविड को हराना मुमकीन हैं...
@@AUTHORINFO_V1@@