प्रभू श्री राम कुणाच्या सातबारावर नाहीत : आव्हाड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2020
Total Views |

Jitendra Awhad_1 &nb
 




नाशिक : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी कायम चर्चेत असणारे राज्याचे गृहनिर्माणमंत्री व राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. प्रभू श्रीराम कोणाच्या सातबारावर नाहीत, असे म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. रामाच्या नावे राजकारण करणे वेगळे आणि भक्ती वेगळी असेही ते म्हणाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते नाशिकमधील सिडको परिसरात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे कोरोना रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यानी ही प्रतिक्रीया दिली आहे. 


“प्रभू रामचंद्र कोणाच्या सातबारावर नाहीत. तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही. रामाच्या नावे राजकारण करणे वेगळे आणि भक्ती करणे वेगळे आहे. ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, ज्याच्या मनात आई-वडिलांबद्दल आत्मीयता आहे, ज्याच्यात मर्यादा आहेत, त्याच्यात कुठेतरी राम लपलेला आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम असं आपण म्हणतो. त्यामुळे हे भूमिपूजन करत आहेत त्याचं एवढं काही नाही, त्यांना वाटतंय ते करत आहेत,” असे आव्हाड म्हणाले. 




@@AUTHORINFO_V1@@