सुशांतची मॅनेजर दिशाच्या आत्महत्येची माहिती 'डिलीट'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2020
Total Views |

disha sailan_1  


मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दररोज आता धक्कादायक माहिती उघड होत आहे. बिहार पोलीसांना मुंबई पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप यापूर्वी लावण्यात आला होता. मात्र, आता त्याच्या मॅनेजर दिशा सॅलियन हिच्याही आत्महत्या प्रकरणाचे पुरावे असलेला फोल्डर मुंबई पोलीसांकडून चुकीने डिलीट झाला आहे, अशी माहिती बिहार पोलीस सुत्रांनी दिली आहे. रिपब्लिक चॅनलने याबद्दलचे वृत्त दिले आहे. 
दरम्यान, या प्रकणावर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही भाष्य केले आहे. या प्रकरणाचा गुंता अधिक वाढत असून यात अदृश्य हात असण्याची शक्यता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येपूर्वी त्याची मॅनेजर दिशा सॅलियन हीने ९ जून रोजी आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येचा तपशील द्यावा तसेच तपासाची माहितीही द्यावी अशी विनंती बिहार पोलीसांनी मुंबई पोलीसांकडे केली होती. मात्र, तिच्या आत्महत्येच्या तपासाबद्दलची माहिती असलेला फोल्डर चुकीने डिलीट झाला आहे, असे उत्तर पोलीसांना देण्यात आला आहे. 
बिहार पोलीस सध्या मुंबईतून या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, शनिवारी त्यांनी दिशाच्या मृत्यू प्रकरणासंदर्भातील माहिती पोलीसांकडे मागितली होती. मात्र, मुंबई पोलीसांनी हे कारण पुढे करत टाळाटाळ केली आहे. शनिवारी बिहार पोलीस मालवणी पोलीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी गेले होते. सुरुवातीला त्यांना दिशाच्या मृत्यूबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली मात्र, त्यांनंतर पोलीसांना कुणाचा तरी फोन आला आणि त्यांचा व्यवहार आमच्याशी बदलला असा आरोप बिहार पोलीसांतील सुत्रांनी केला आहे. 
दरम्यान, या प्रकरणात सुशांतच्या कुटूंबियांकडून व कंगना करून लक्ष्य करण्यात आलेल्या रिया चक्रवर्ती हिने काही दिवसांपूर्वी राहत असलेले घर सोडले असल्याची माहिती इमारतीच्या कर्मचाऱ्याने दिली आहे. मध्यरात्री रिया आणि तिचे कुटूंबिय एका कारमध्ये बसून कुठेतरी निघून गेले. त्यांच्यासोबत भरगच्च सामान होते, असेही त्याने सांगितले आहे.




@@AUTHORINFO_V1@@