राम मंदिर आणि मुघल वंशज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Aug-2020   
Total Views |

ramandir_1  H x



मुघलांच्या वंशजाने मात्र, राम मंदिर बांधण्यासाठी एक किलो सोन्याची विट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुघलांच्या वंशजाने राम मंदिराचे वास्तव मान्य केले, पण ओवेसीची तडफड काही थांबत नाही. ‘मंदिर वही बनायेंगे मगर तारीख नहीं बतायेंगे’ म्हणणारे लोकही आज सैरभैर झाले आहेत. कारण, आज मंदिर पण तिथेच होणार आहे आणि तारीखही जाहीर आहे.



‘भेटू पुन्हा जेरूसलेमला’ असे अतिशय श्रद्धेने आणि निष्ठेने ज्यू म्हणत. शेवटी त्यांनी इस्रायल देश निर्माण केला. ‘मंदिर वही बनायेंगे’ म्हणत श्रद्धाळू हिंदूंनीही शेवटी अयोध्येत राममंदिर निर्माणाचे कार्य केलेच. मात्र, यावर ओवेसी म्हणतात की, “आम्ही येणार्‍या पिढ्यांना सांगत राहू की तिथे बाबरी मशीद होती.” पण मुघलांच्या वंशजाने मात्र, राम मंदिर बांधण्यासाठी एक किलो सोन्याची विट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुघलांच्या वंशजाने राम मंदिराचे वास्तव मान्य केले, पण ओवेसीची तडफड काही थांबत नाही. ‘मंदिर वही बनायेंगे मगर तारीख नहीं बतायेंगे’ म्हणणारे लोकही आज सैरभैर झाले आहेत. कारण, आज मंदिर पण तिथेच होणार आहे आणि तारीखही जाहीर आहे. असो. काही लोकांना खात्रीच होती की, या देशात राम मंदिर कधीच उभारले जाणार नाही. कारण, या देशात सत्ताकारणासाठी धर्माची तेढ उभी करण्याचे तंत्र काही लोकांना अवगत आहे. त्यामुळे विशिष्ट धर्माचे लांगलचालन आणि खोटा अपप्रचार करण्यात या लोकांनी धन्यता मानली. हजारो वर्षांचा इतिहास दडपला गेला तरी लोकांच्या मनातील श्रद्धा जीवंतच होती आणि आहे. ओवेसीसारखे लोक काय सांगणार बाबरीचा इतिहास? ओवेसी स्वत:ला भारतीय संविधानिक न्यायव्यवस्थेपेक्षा मोठे समजतात का? भारतीय न्यायव्यवस्थेने दिलेला रामजन्मभूमीचा निर्णय हा काही एका रात्रीतून दिलेला निर्णय आहे का? वर्षानुवर्षे हा न्यायालयीन लढा लढला गेला. त्याच्या सत्यसाक्षी पुराव्यातूनच रामजन्मभूमीचा निर्णय न्यायालयाने दिला.

रामजन्मभूमी वाद आणि त्यावरून चाललेले रणकंदन प्रत्येक हिंदूच्या अस्मितेचाच जीवंत प्रश्न होता. पण आज मुघल बादशाह बहादूरशाह जफर यांचे वंशज असल्याचा दावा करणारे राजकुमार याकुब हबीबुद्दीन तुसी यांनी राम मंदिरासाठी एक किलो सोन्याची विट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली आहे. तुसी म्हणाले की, १००कोटी बांधवांची अपार श्रद्धा असलेला हा मुद्दा सलोख्याने सोडवण्यात आला आहे. ही बाब हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समुदायासाठी आनंदाची आहे. ओवेसी यांना मुघलाच्या वंशजाचे हे विचार समजतील का? बहुतेक नाहीच. कारण, हिंदू-मुस्लीम वाद चघळण्यातच त्यांची रोजी-रोटी शेकली जाते. पण काहीही असो ‘मंदिर वहीं बना और तारीख भी जाहिर हैं’ आणि मुघलांचेही समर्थन आहे.


शू... ही आणीबाणी नाही!


‘आपले’ म्हणून राज्याने यांच्या सगळ्या नाकर्तेपणाकडे दुर्लक्ष केले. पण आता जेव्हा पाणी डोक्यावरून जाऊ लागले तेव्हा गप्प कसे बसायचे? कोरोना ‘क्वारंटाईन सेंटर’मध्ये महिलेवर बलात्कार होतो किंवा ‘स्वॅब टेस्टिंग’च्या नावाखाली महिलेच्या योनीमध्ये ‘स्वॅब टेस्टिंग’ केले जाते. यावर प्रश्न कुणाला विचारायचे? हे सगळे अत्याचार, अन्याय घडत आहेत. यावर नियंत्रण कोण ठेवणार? ‘लॉकडाऊन’च्या नावावर होणारी जनतेची फरफट कधी थांबणार? मुख्यमंत्री म्हणतात, “ ‘लॉकडाऊन’ कोरोना ठरवतो.” यावर काही नतद्रष्ट लोक म्हणतात की, कोणता कोरोना? चीनवरून आलेला की पडळकरांनी सांगितलेला? आता सत्ताधार्‍यांनी कोरोनावरच प्रकरण ढकलल्याने राज्यातल्या अभूतपूर्व अनियंत्रित परिस्थितीवर कोणाला प्रश्न विचारायचे? कोरोनाच जर निर्णय घेतोय तर मग सत्ताधारी आणि प्रशासन काय करतात?


वाधवान प्रकरण, करमुसे प्रकरण तर थंड्या बस्त्यात बंद आहे. साधु-संतांच्या हत्येने महाराष्ट्र रक्तरंजित झाला. सिनेस्टार सुशांत सिंगच्या आत्महत्येने वादळ उठले आहे. एक अनिश्चितता, भय सर्वत्र भरून आहे. मात्र, या अशा वातावरणात कुणीही काही बोलायचे नाही. कारण, प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की कोरोना ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेतो तिथे कोण कोरोना, कुठला कोरोना, असे प्रश्न विचारू नयेत. महाराष्ट्राच्या जनतेने आपला लढवय्या इतिहास, कर्तृत्ववान बाणा, अन्यायाविरोधातला संघर्षशील स्वभाव सगळे विसरून फक्त इतकेच लक्षात ठेवायचे आहे की, कोरोनाच्या नावाखाली जी काही सामाजिक, आर्थिक पिळवणूक होईल ती सहन करायची. तोंडातून ब्र शब्द काढायचा नाही. जर या सगळ्या परिस्थितीला दूर करण्यासाठी तुम्ही पाऊल उचलले तर खबरदार. विरोधी पक्ष असू दे, समाजसेवक असू दे की कुणीही असू दे. या परिस्थितीमध्ये आपल्या बांधवांना मदत करण्यासाठीही तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल. सत्कार्य करताना कशाला परवानगी, समाजकार्य करताना कशाला बंदी? असे काही मनातही आणायचे नाही. ही आणीबाणी आहे का? शू.. ही आणीबाणी नाही. कारण, हे काही सत्ताधारी किंवा प्रशासनाचे अपयश नाही तर हा कोरोनाचा निर्णय आहे समजलं.
--
@@AUTHORINFO_V1@@