"काँग्रेसचे नेतृत्त्व गांधी घराण्याशिवाय दुसऱ्याने सांभाळावे" : प्रियांका गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2020
Total Views |

Priyanka Gandhi_1 &n
 
 
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी एका मुलाखती दरम्यान काँग्रेस पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याव्यतिरीक्त दुसऱ्या कोणीतरी सांभाळावे, असे मत व्यक्त केले. २०१९च्या लोकसभा निवडणूकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहूल गांधी यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी ठामपणे सांगितले होते की, काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला बनवले पाहिजे. राहुल गांधींच्या या मताला प्रियांका गांधी यांनी सहमती दर्शवली.
 
 
 
“राहुल गांधींनी सांगितल्याप्रमाणे आमच्यापैकी कुणीच काँग्रेसचा अध्यक्ष होऊ नये, मी ही त्यांच्या या मताशी सहमत आहे. मला हेही वाटत आहे की, पक्षाने आता आपला रस्ता निवडण्याची गरज आहे,” असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान, “काँग्रेसने नवीन माध्यमांना समजण्यास उशीर केला. कारण पक्षाने या माध्यमाचा वापर करुन आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली. तोपर्यंत खूप नुकसान झाले होते. भविष्यात जर कोणी गांधी कुटुंबीयांशिवाय काँग्रेसचा अध्यक्ष बनला, तर त्यांच्या आदेशाचे आणि निर्देशांचे आपण पालन करणार,” असेही प्रियंका यांनी सांगितले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@