दिलासादायक : देशातील २० लाख रुग्ण कोरोनामुक्त!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2020
Total Views |

Corona_1  H x W


एकूण रुग्णसंख्येपैकी केवळ २५% अॅक्टिव्ह रुग्ण!


दिल्ली : भारतात २०३ दिवसांच्या कोरोना काळात मंगळवारी प्रथमच अॅक्टिव्ह रुग्ण वाढीचा दर घसरून ०.५% झाला. म्हणजे, अॅक्टिव्ह रुग्ण दुपटीचा अवधी १४० दिवसांवर आला. कारण, नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा वाढल्याची आकडेवारी सोमवारी समोर आली. ६ महिन्यांत फक्त ३ वेळा असे घडले आहे. देशात तब्बल २० लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आता फक्त ६.७५ लाख अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. १.९% रुग्णांचा मृत्यू झाला.


महत्त्वाची बाब म्हणजे, महिनाभरात रिकव्हरी रेट १०% पर्यंत वाढला आहे. १७ जुलैला तो ६२.२% होता, १७ ऑगस्टला तो ७३% झाला. दिल्ली, तामिळनाडू, गुजरात, तेलंगण, प. बंगाल व बिहारमध्ये रिकव्हरी रेट वेगानेवाढला आहे. मात्र चंदीगड, पंजाब, केरळ, छत्तीसगडमध्ये हा दर घटला आहे. आधी या राज्यांचा रिकव्हरी रेट देशात सर्वोत्तम होता.


शहरांत रिकव्हरी वाढल्याने राज्यांच्या स्थितीत सुधारणा झाली आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, जयपूर, भोपाळ, इंदूर, पाटणा, जोधपूर, अहमदाबाद, सूरत, औरंगाबादसारख्या शहरांत वेगाने रिकव्हरी वाढली आहे. अशा २० शहरांतच देशातील ८०% रुग्ण होते.





आता देशातील केवळ २०% रुग्णच रुग्णालयांत उपचार घेत आहेत. देशभरातील १८ लाख खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे तात्पुरती रुग्णालये उभारण्याची तयारी आता थंडावली आहे.



@@AUTHORINFO_V1@@