करण जोहरची पद्मश्री काढून घ्या : कंगना राणावत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Aug-2020
Total Views |

Karan Johar_1  



‘गुंजन सक्सेना’ चित्रपटावरून कंगना पुन्हा भडकली!


मुंबई : 'मी भारत सरकारला विनंती करते की, त्यांनी करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा. एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून बोलताना त्याने मला बिनदिक्कतपणे ही इंडस्ट्री सोडून जाण्याविषयी वक्तव्य केलं होते. उरीवेळीही त्याने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. त्याने सुशांतचे करिअरही संपवले आणि आता तर त्याने भारतीय सैन्यावर देशद्रोही चित्रपट बनवला आहे,’ असे ट्विट करत अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा कारण जोहरवर तोफ डागली आहे.


अभिनेत्री जान्हवी कपूरचा ‘गुंजन सक्सेना– द कारगिल गर्ल’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. मात्र प्रदर्शनाच्या दिवशीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. या चित्रपटातील काही दृष्यांवर भारतीय हवाईदलाने आक्षेप नोंदवला. याबाबत भारतीय हवाईदलाने यासंदर्भातील पत्र सेन्सॉर बोर्ड, धर्मा प्रोडक्शन कंपनी आणि नेटफ्लिक्सला पाठविले होते.







त्यानंतर आता गुंजन सक्सेनासोबत भारतीय हवाई दलात पायलटचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या श्रीविद्या राजन यांनी चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. कारगिलवेळी विमान उडवण्यात आपण पहिले होतो असा दावा त्यांनी केला आहे. शिवाय, चित्रपटात जो पंजा लढवायचा सीन आहे असे काहीच हवाई दलाच्या प्रशिक्षणावेळी झालेच नव्हते, असा दावाही त्यांनी केला आहे. गुंजन सक्सेना या चित्रपटात वास्तव घटनांना तोडून मोडून दाखवण्यात आले’ आहे, असे श्रीविद्या यांचे म्हणणे आहे. त्याच्या या संदर्भातल्या ट्विटला रिट्विट करताना कंगनाने करण जोहरला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.











@@AUTHORINFO_V1@@