नामशेष झालेल्या दुर्मीळ खारीचे ७० वर्षांनंतर दर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2020
Total Views |

squirrel _1  H


उत्तराखंडमधील गंगोत्री अभयारण्यात वावर 

मुंबई (प्रतिनिधी) - जगातून ७० वर्षांपूर्वी नामशेष झाल्याचा कयास असलेली खार पुन्हा एकदा निदर्शनास आली आहे. वूल्ली फ्लायिंग खार असे या खारीचे नाव असून ती उत्तराखंडच्या गंगोत्री राष्ट्रीय उद्यानात आढळून आली आहे. येथील 'फाॅरेस्ट रिसर्ट इस्टिट्यूट'ने सोमवारी या संशोधनाची अधिकृत घोषणा केली. 
 
 
 
जगातून नामशेष झाल्याची शक्यता असलेली वूल्ली फ्लायिंग खार ही पुन्हा एकदा निदर्शनास आली आहे. उडणाऱ्या खारींमधील सगळ्यात मोठी असलेली ही खार गेल्या ७० वर्षांपासून नामशेष झाल्याची शक्यता होती. 'आययूसीएन'च्या लाल यादीत या खारीला नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र, आता ही खार उत्तराखंडाच्या गंगोत्री अभयारण्यात आढळून आली आहे. 'फाॅरेस्ट रिसर्च इस्टिट्यूट'ने याठिकाणी केलेल्या सर्वेक्षणात १९ वनपरिक्षेत्रांपैकी १३ परिक्षेत्रांमध्ये तिचा वावर आढळून आला. त्यामुळे ही प्रजात अजूनही तिच्या नैसर्गिक अधिवासात तग धरुन असल्याचे समोर आले आहे. २००४ मध्ये 'वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन सोसायटी'चे डॉ. पीटर जह्लर यांना ही खार आढळली होती. पीटर यांच्या शोधापर्यंत ही खार नामशेष झाल्याचे मानले जात होते. 
 
 
वूल्ली फ्लायिंग खारीचा अधिवास हा केवळ दक्षिण आशिया देशांमधील भारत आणि पाकिस्तानात आहे. ही प्रजात सद्य परिस्थितीत पाकिस्तानमधील डायमर - दक्षिण गिलगिट जिल्ह्यांमधील छोट्याशा भागात आणि उत्तर भारतात आढळते. गुहा, कडे, कोरड्या जंगलांतील उंच कड्यांवर सापडते. या भागांमधील ब्ल्यू पाइन, चिलगोझा पाइन, जुनिपर्स, देवदार या झाडांवरही ती दिसून येते. हा प्राणी शाकाहारी आहे.

@@AUTHORINFO_V1@@