जम्मू-काश्मीरच्या बारामूलात दहशतवाद्यांकडून सुरक्षादलावर गोळीबार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2020
Total Views |
Kashmir_1  H x


सीआरपीएफचे २ जवान आणि एक पोलिस अधिकारी शहीद!


जम्मू : जम्मू-काश्मीरच्या बारामूला जिल्ह्यातील करीरी भागात दहशतवाद्यांनी सोमवारी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त नाका तुकडीवर गोळीबार केला. या हल्ल्यात ३ जवान शहीद झाले आहेत. या गोळीबारात सीआरपीएफच्या २ जवान आणि पोलिसांच्या एका स्पेशल अधिकाऱ्याला गोळी लागली. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तेथे त्यांचा मृत्यू झाला. या भागात सुरक्षादलाकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.


चार दिवसांत सुरक्षादलांवर दहशतवादी हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. १४ ऑगस्ट रोजी नौगाममध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात २ पोलिस शहीद झाले होते. काश्मीर खोऱ्यात मागील काही दिवसांपासून पोलिस आणि सैन्याच्या दलावरील दहशतवादी हल्ले वाढले आहेत. १२ ऑगस्ट रोजी देखील बारामूलाच्या सोपोरमध्ये सुरक्षादलांवर हल्ला केला होता. ज्यामध्ये एक जवान जखमी झाला होता. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त दलाला निशाणा बनवले होते.


बारामूला जिल्ह्यातील सोपोर भागात १ जुलै रोजी देखील सीआरपीएफच्या दलावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात एक जवान शहीद, तर ३ जवान जखमी झाले होते. दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक नागरिकाचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीसोबत त्यांचा ३ वर्षीय नातू सोबत होता. त्या मुलाल सुखरूप वाचवण्यात सुरक्षा दलाला यश आले होते.





@@AUTHORINFO_V1@@