जपानच्या अर्थव्यवस्थेत दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वाधिक घसरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Aug-2020
Total Views |

Japan_1  H x W:
 
 
टोकीयो : कोरोना महामारीमुळे जगातील तिसरी सर्वात मोठी मानली जाणारी अर्थव्यवस्था असलेल्या जपानवरही याचा सर्वात वाईट प्रभाव पडला. एप्रिल-जूनच्या तिमाहीत सर्वाधिक २७.८ टक्के इतकी घसरण पाहायला मिळाली आहे. सोमवारी जारी झालेल्या जपानच्या कॅबिनेटमध्ये विकासदरात जानेवारी-मार्च या तिमाहीच्या तुलनेत ७.८ टक्के इतकी घसरण झाली आहे. जपान जानेवारीपासूनच आर्थिक मंदीशी सामना करत आहे.
 
जपानी प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जपानच्या अर्थव्यवस्थेत दुसऱ्या विश्व युद्धानंतरची सर्वात मोठी घसरण आहे. १९८० पासूनची आकडेवारी जपानकडे नोंद आहे. यापूर्वी २००९ मध्येही अशाच प्रकारची घसरण पाहायल मिळाली होती. २००९ मध्ये जागतिक मंदीची झळ जपानलाही बसली होती. गतवर्षापासून चीनमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतरच जपानच्या अर्थव्यवस्थेवर याचा प्रभाव दिसत होता.
 
 
कोरोना विषाणूचे संकट जगभरात तितचेच वाढत आहे. लॉकडाऊन आणि अन्य उपाययोजनांचा फटका आर्थिक क्षेत्राला बसत आहे. जपानच्या अर्थव्यवस्थेवर डिसेंबर तिमाहीत १.८ टक्के घसरण नोंदवण्यात आली होती तर मार्चमध्ये ही नोंद ०.६ टक्के इतकी होती. जानेवारीपासूनच मंदीची झळ जपानला बसण्यास सुरुवात झाली आहे.
 
 
जून तिमाहीत जपानच्या निर्यातीत ५६ टक्के घसरण नोंदवण्यात आली होती. यात २९ टक्के घसरण नोंदवण्यात आली होती. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी जपानमध्ये संपूर्ण लॉकडाऊन पाळण्यात आला नाही. मात्र, तरीही इथल्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम दिसून आला. जपानमध्ये कोरोनाचे एकूण ५६ हजार इतके रुग्ण आहेत.
 
 
जपानची निर्यात ही चीनी अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. जपान हा चीनवर निर्भर आहे. चीनमध्ये ज्या प्रकारे कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यात आले आहे, त्यामुळे जपानसाठी आशादायक चित्र आहे. परंतू अद्याप इथे संपूर्णपणे व्यवहार सुरळीत सुरू झालेले नाहीत.
@@AUTHORINFO_V1@@