तारापूर औद्योगिक क्षेत्रातील केमिकल कंपनीत भीषण स्फोट

    17-Aug-2020
Total Views |

Palghar_1  H x
पालघर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील नांदोलीय केमिकल्स या कंपनीमध्ये आज (सोमवार) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून, तीन कामगार गंभीररित्या जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप अधिकृतरीत्या माहिती मिळाली नसली तरी १३ जणांना यामधून बाहेर काढण्यात यश आले आहे.
 
 
या स्फोटामुळे सालवड, पास्थळ, बोईसर, तारापूर, चिंचणी व किनारपट्टीच्या सर्व गावांमध्ये मोठा कंप जाणवला असून स्फोटाचा आवाजाने १० किलोमीटर पर्यंतचा परिसर हादरला. औद्योगिक वसाहतीच्या टी झोनमध्ये रासायनिक प्रक्रियेदरम्यान स्फोट झाला असल्याचे समजते. बोईसर पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.