आनंद महिंद्रा म्हणतात, ही 'Thar' आपल्या गॅरेजमध्ये पाहीजे !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2020
Total Views |
THAR_1  H x W:

देशातील अग्रगण्य मोटार कंपनी महिंद्राने आपल्या बहुप्रतिक्षित Mahindra Thar च्या नव्या आवृत्तीची घोषणा केली. स्वातंत्र्य दिनानिमित्त महिंद्राने आपल्या या नव्या उत्पादनावरून पडदा उठवला आहे. नव्या SUVची घोषणा करताना स्वतः आनंद महिंद्राही या मॉडेलचे चाहते बनले आहेत. २ ऑक्टोबर २०२० पासून या कारची बुकींग सुरू होणार आहे. मात्र. या कारची वाट पाहणे माझ्यासाठी आता कठीण होत असून यावरून माझ्या टीमशी माझा वादही होईल, अशी कोपरखळीही दिली.
 



THAR_2  H x W:
 
 
 
 
आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत या नव्या कोऱ्या Mahindra Thar ची घोषणा केली. लवकर माझ्या गॅरेजमध्ये ये, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले आहे. Mahindra Thar मध्ये अपेक्षेप्रमाणे नवीन बदल केले आहेत. नवी कोरी Thar पाहिल्यावर तुम्हाला jeep ची आठवण होते. नवे डिझाइन, मॉडर्न इंटिरिअर आणि बीएस 6 मानकांसह तयार करण्यात आलेली ही SUV पाहता क्षणी तुमचे लक्ष वेधून घेईल.
 
 
 
THAR_3  H x W:
 
Thar मध्ये दोन एअरबॅग्स, रिअर पार्किंग सेंसर्स, आणि स्पीड अलर्ट सिस्टम सारखे फिचर्स आहेत. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरीअंटमध्ये इंजित उपलब्ध असणार आहेत. 2.2 लिटर mHawk असलेले डिझेल इंजिन 130 bhp ताकद आणि 320 Nm टॉर्क निर्माण करते. तर 2.0 लिटर mStallion TGDi पेट्रोल इंजिनही यात उपलब्ध आहे. यात 6-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स असणार आहे. पेट्रोल इंजिन हे150 bhp ची पॉवर आणि 320 Nm इतका टॉर्क जनरेट करेल.

THAR_4  H x W:
 
 
महिंद्राने नवीन जनरेशनच्या Thar ला बॉक्सी लूकमध्ये सादर केले आहे. मागील मॉडेलच्या तुलनेत नवी Thar जास्त रूंद आणि लांब आहे. नवीन थार ही भारतात डिझाइन करण्यात आली आहे. नाशिकच्या प्लान्टमध्ये ही गाडी तयार करण्यात आली आहे.
 

THAR_5  H x W:  
 
नवीन थार ही सहा रंगात उपलब्ध असणार असेल यात रेड रेज (Red Rage), मिस्टिक कॉपर (Mystic Copper), नेपोली ब्लॅक (Napoli Black,), एक्वामरीन (Aquamarine), गॅलेक्सी ग्रे (Galaxy Grey ) आणि रॉकी बेज (Rocky Beige) हे रंग मिळतील. रूफ माउंटेड स्पीकर्स, नवीन MID यूनिट, स्टियरिंग माउंटेड कंट्रोल, ऑटोमेटिक क्लाइमेट कंट्रोल, लेदर अपहोल्स्ट्री, ट्रॅक्शन कंट्रोल, ड्यूल एयरबॅग्स या कारला आत्तापर्यंतच्या सर्व आवृत्तीतील सर्वोत्तम बनवतात.




THAR_6  H x W:
@@AUTHORINFO_V1@@