भाजप नेते निलेश राणे कोरोना पॉझिटिव्ह

    16-Aug-2020
Total Views |

nilesh rane_1  



मुंबईः
राज्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनाही करोनाची लागण झाली आहे. निलेश राणे यांनीच ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

'करोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने मी करोनाची चाचणी करून घेतली. त्यानंतर माझा कोविड-१९चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाइन करुन घेतले आहे.' असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच, 'गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोनाची चाचणी करून घ्यावी,' असे आवाहन त्यांनी केले आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार सुजितसिंह यांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.