तृणमूल काँग्रेसचा निषेध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Aug-2020   
Total Views |

vedh_1  H x W:


देशद्रोही विधानांबद्दल अरूंधती म्हणते की, “ते माझे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे.” नक्षली आणि दहशतवाद्यांचे समर्थन करतानाही ती हेच म्हणते. अरूंधती रॉयच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याची व्याप्ती काय आहे हे माहिती नाही. पण तिच्या अभिव्यक्ती आणि कला स्वातंत्र्याला अनुसरूनच की काय, प्रणव प्रकाश या चित्रकाराने माओ, ओसामा बिन लादेनसोबत अरूंधती रॉय यांचे नग्न चित्र काढले होते. या चित्रामुळे त्यांना मारहाण झाली. यावर काहींचे म्हणणे होते, अरूंधतीला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे मग प्रकाश या चित्रकाराला का नाही?


सुदर्शन प्रामाणिक या ४० वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. सुदर्शनचा गुन्हा काय? तर त्याने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वज पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आता कुणालाही वाटेल सुदर्शन ही व्यक्ती नक्की पाकिस्तान किंवा तशाच एखाद्या अतिरेकी-दहशतवाद्यांच्या परिसरात झेंडावंदनाचा कार्यक्रम करत असावी. पण नाही, झेंडावदंन करण्याची तयारी करत होता म्हणून सुदर्शन यांची हत्या झाली ती पश्चिम बंगालमध्येे. ज्या भूमीला देशनिष्ठ क्रांतिकारकांची पुण्यभूमी मानली जाते. त्या पश्चिम बंगालमध्ये झेंडावदंनाचा कार्यक्रम घेतला म्हणून एखाद्या व्यक्तीची हत्या होणे हा पश्चिम बंगालच्या राष्ट्रनिष्ठ अस्मितेचा अपमान आहे. पश्चिम बंगालमध्ये कार्यकर्त्यांची हत्या होणे, नवीन गोष्ट नाही. आधी कम्युनिस्टांच्या कारकिर्दीमध्ये ममतासकट सर्वच इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना कम्युनिस्टांच्या हिंसक हल्ल्याला सामोरे जावे लागले आहे. आज कम्युनिस्ट गेले आणि तृणमूल काँग्रेसचे राज्य आले. पण तृणमूल काँग्रेसने कम्युनिस्टांची री ओढत इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करणे सुरूच ठेवले. आपण विचारही करू शकत नाही की, पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेसची काय दहशत आहे ती. जाधवपूर युनिव्हर्सिटीमध्ये भाजपच्या बाबुल सुप्रियो यांच्यावर हल्ला झाला. यावर अभाविप आणि भाजपने आंदोलन केले. त्यावेळची एक नुमनेदाखल घटना सांगायलाच हवी. अरविंदो हा २२ वर्षाचा युवक, अभाविपचा कार्यकर्ता. तो या आंदोलनात सहभागी झाला होता. आंदोलन करत असतानाच पोलीस त्याला पकडायला आले. पोलिसांनी कारण सांगितले, ४० मुली अभाविपच्या आंदोलनाला विरोध करायला आल्या तेव्हा त्या आंदोलनामध्येच अरविंदोने त्यांचा विनयभंग केला. यावर अरविंदोसोबत असलेल्या सगळ्यांनी सांगितले की, वर्दळ असलेल्या चौकात आंदोलन करत असताना विरोध करायला मुली काय मुलंही आली नाहीत. जिथे शेकडो लोक वाहन ये-जा करतात तिथे एकटा अरविंदो ४० मुलींचा विनयभंग कसा करेल? यावर पोलिसांकडे उत्तर नव्हते. अरविंदो हे एकच उदाहरण नाही, तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला न मानणार्‍या बहुतेक सगळ्यांवरच अशा खोट्या पोलीस केसेस केल्या जातात. यामागचा उद्देश एकच की कार्यकर्ते घाबरून घरी बसतील. जर गप्प बसला नाही तर मग त्याचा खून करणे हा दुसरा मार्ग आहेच. तृणमूल काँग्रेसचा निषेध...



'त्यां'चे अभिव्यक्तिस्वातंत्र्य !


‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या पुस्तकामुळे ‘बुकर पुरस्कार’ मिळालेल्या अरूंधती रॉयला नक्कीच असे वाटते की, भारताच्या समर्थनातले जे काही आहे त्याला विरोध केला की, आपण आपल्या देशद्रोही कंपूत हुशार म्हणून गणले जाणार. हिंदू समाज, संस्कृती, श्रद्धा, भारतीय एकता, भारत देश याबद्दल या महिलेला कमालीचा आकस आहे. तिची काही विधाने पाहा, हिंसेबाबत एका ठिकाणी अरूंधती म्हणते की, “नक्षलवादी आदिवासींच्या हक्कासांठी लढत आहेत आणि त्याशिवाय आदिवासींना पर्याय नाही.” ती नक्षलीच नव्हे तर काश्मीर अतिरेक्यांचेही समर्थन करते.काश्मीरला भारताने आझादी द्यावी, असे हीचे म्हणणे. नक्षली किंवा दहशतवाद्यांविरोधी पोलिसी-सैनिकी कारवाईला तिचा तीव्र आक्षेप आहे. ‘सीएए’, ‘एनपीआर’ या कायद्याबाबतही तिने देशद्रोहाचीच भूमिका घेतली होती. आताही भीमा-कोरेगावमध्ये सहभागी असलेल्यांवर गुन्हे दाखल झाले. यावर अरूंधती काल-परवा म्हणाली की, “ही विनाशकारी हिंदू राष्ट्रवादी नीती आहे आणि मला नवल वाटते की, या असल्या विचारधारेला समर्थक पण आहेत.” अर्थात, अरूंधती आणि तिच्यासारख्या लोकांचा जळफळाट यासाठीच होतोय की, आज देश समर्थ आहे. त्यातही हिंदुत्व धारणेला मानणारी व्यक्ती सत्तास्थानी आहे. असो, आपल्या सर्वच देशद्रोही विधानांबद्दल अरूंधती म्हणते की, “ते माझे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे.” नक्षली आणि दहशतवाद्यांचे समर्थन करतानाही ती हेच म्हणते. अरूंधती रॉयच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याची व्याप्ती काय आहे हे माहिती नाही. पण तिच्या अभिव्यक्ती आणि कला स्वातंत्र्याला अनुसरूनच की काय, प्रणव प्रकाश या चित्रकाराने माओ, ओसामा बिन लादेनसोबत अरूंधती रॉय यांचे नग्न चित्र काढले होते. या चित्रामुळे त्यांना मारहाण झाली. यावर काहींचे म्हणणे होते, अरूंधतीला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे मग प्रकाश या चित्रकाराला का नाही? अर्थात, अरूंधतीच नव्हे तर कोणत्याही महिलेच्या अश्लिल चित्राला विरोधच असायला हवा. पण महामानवतावादी आणि अतिबुद्धिवादीचा आव आणणार्‍या या ‘टुकडे टुकडे गँग’ने अभिव्यक्तिस्वातंत्र्याची मर्यादा धुसर केली आहे. आपल्या नव्हे पण त्या गँगच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यामध्ये प्रकाश यांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य नक्कीच येते. कारण, आजपर्यंत या गँगने अशाच प्रकारे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गैरवापरच केला आहे.
@@AUTHORINFO_V1@@