एनसीसीचा विस्तार करण्याचा निर्णय ऐतिहासिक : अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2020
Total Views |
Amit shaha_1  H


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या ७४व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!


नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : देशातील १७३ सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये एनसीसीचा विस्तार करण्याचा निर्णय अतिशय ऐतिहासिक आहे. यामुळे युवकांच्या प्रतिभेचा विकास होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वातंत्र्यदिनी व्यक्त केले आहे.


कोरोना संसर्गातून नुकतेच बरे झालेले देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी झेंडावंदन केले. त्यानंतर त्यांनी देशवासियांना ७४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी एनसीसीचा विस्तार करण्याच्या पंतप्रधानांच्ये घोषणविषयी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, देशाची भूसीमा आणि किनारी सीमेवर असलेल्या १७३ जिल्ह्यांमध्ये एनसीसीचा विस्तार करण्याचा निर्णय अतिशय ऐतिहासिक आहे. यामुळे १ लाख युवकांना एनसीसीमध्ये सहभागी होता येणार असून त्यामुळे त्यांना योग्य प्रशिक्षण आणि कौशल्य प्रदान केले जाणार आहे. त्याचप्रमाणे युवकांच्या प्रतिभेचा विकास होऊन त्यांना नव्या संधीही प्राप्त होणार आहेत.




जागतिक अर्थव्यवस्थेत गती देण्याचे भारतामध्ये सामर्थ्य- राजनाथ सिंह

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या निवासस्थानी झेंडावंदन केले आणि देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनात आत्मनिर्भर भारतचा रोडमॅप सादर केल्याचे सांगितले. कोरोनाच्या संकटाचे रुपांतर संधीत करण्याची किमया भारताने साधली आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष आता भारताकडे असून जागतिक कल्याण आणि जागतिक अर्थव्यवस्थेस गती देण्याचे सामर्थ्य भारतामध्ये असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.




नॅशनल डिजीटल हेल्थ मिशन क्रांतिकारी- नितीन गडकरी

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी झेंडावंदन केले आणि देशवासियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी नॅशनल डिजीटल हेल्थ मिशन क्रांतिकारी ठरणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, यामुळे भारतीय आरोग्य क्षेत्र अद्ययावत होणार असून प्रत्येक नागरिकाची आरोग्यविषयक माहिती एकाच ठिकाणी कळणे शक्य होणार आहे. यामुळे रुग्णालये, डॉक्टर आणि नागरिक यांच्यामधील दरी कमी होणार असून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा प्राप्त होतील, असेही गडकरी यांनी सांगितले.








@@AUTHORINFO_V1@@