मुंबई : अखंड भारत व्यासपीठातर्फे एका विशेष ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि. रविवार दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता हे ऑनलाईन चर्चासत्र होणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार हे यावेळी संबोधित करणार आहेत. तसेच यावेळी राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचचे राष्ट्रीय सचिव विनायक काळे, संतोष आदक आणि सुबोध विश्वासरावही उपस्थित असणार आहेत.