"भारतीय संस्कृती व संसाधनांमध्ये आत्मनिर्भर होण्याची ताकद"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2020
Total Views |
RSS Bhaiyaji Joshi_1 
 
 

काशी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश (भय्याजी) जोशी यांनी ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात काशीतील रोहनिया येथे कार्यक्रमात ध्वजारोहण केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी देशाला आत्मनिर्भर बनण्याचे आवाहनही केले. 
 


उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, "आज देशाचा ७४ वा स्वातंत्र्य दिन. कोरोनामुळे हा कालखंड एक चर्चेचा विषय बनला आहे. कोरोनाची महामारी देशासह संपूर्ण जगभरात कहर माजवत आहेत. या खडतर काळातही भारतात काही विभिन्न उदाहरणे दिसत आहेत. संख्यात्मक माहितीचा विचार केला असता अन्य समृद्ध आणि बलाढ्य देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाचा मृत्यू दर आणि संक्रमणाचाही वेग कमी आहे."
 
 
 
भारतीय संस्कृतीची आठवण करून देत त्यांनी भारतीयांच्या रोगप्रतिकारक शक्तीचाही उल्लेख केला. भय्याजी म्हणाले, "देशवासीयांची राहण्याची पद्धती, जीवनशैली, इथली रोगप्रतिकार क्षमता, इथले पाणी, हवा, परंपरा, सांस्कृतिक जीवनशैली आणि संघर्ष करण्याची क्षमता देशवासीयांना बळ देते. तुलनेने समृद्ध असणाऱ्या अमेरिकेत या महामारीने सर्वाधिक जास्त कहर माजवला होता. देशात काही ठिकाणी कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. परंतू काही भागांमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही."
 
 
 
या प्रसंगी ७४ व्या स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने आपण व्यक्तीशः, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवन स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प करायला हवा. गेल्या ७४ वर्षांमध्ये आपण याकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विदेशी गोष्टींवर निर्भर रहावे लागत होती. आजही आपण अन्य देशांवर अवलंबून आहोतच. कोरोना महामारीमुळे आपल्याला आत्मनिर्भर बनण्याची संधी मिळाली आहे. देशातील परंपरा आणि संसाधनांच्या जोरावर आपण आत्मनिर्भर बनायला हवे, असे आवाहनही त्यांनी देशवासीयांना केले.
 
 
 
ते म्हणाले, "आपण स्वतः आत्मनिर्भर बनायला हवे. आपल्या राष्ट्रालाही आत्मनिर्भरतेकडे न्यायला हवे. जगभरातील विविध देशांचे उदाहरण घेऊन आपण त्या दृष्टीने कूच करायला हवी. याद्वारे आपण बड्या देशांच्या आर्थिककोंडीतून सुटू शकतो. आपला विकास स्वतः करू शकतो. आत्मनिर्भर बनू शकतो. हेच लक्ष्य समोर ठेवूनच विकासाकडे पाऊल ठेवायला हवे."
 
 
 
आपल्या अध्यक्षीय भाषणात सुरभि शोध संस्थांचे संस्थापक सुर्यकांत जलान (कानू भाई) म्हणाले. "या परिसरात आपण आपला स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. यानिमित्त रा.स्व.संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांना पाहून मी आनंदित आहे, त्यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला हे पाहून सुरभि शोध संस्थान व परीवार गौरवान्वित झाला आहे. त्यांचे मी आभार व्यक्त करतो."

@@AUTHORINFO_V1@@