भारत जरूर आत्मनिर्भर होईल : पंतप्रधान मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2020
Total Views |
India_1  H x W:


लालकिल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला ध्वजारोहण सोहळा!

नवी दिल्ली : आज भारत देश ७४वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ७.३० वाजता लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. ध्वजारोहण समारंभानंतर त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. ‘कोविड-१९च्या संकटात १३० कोटी भारतीयांनी स्वावलंबी होण्याचा आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प मनावर घेतला आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारत हा सर्वांचा मंत्र बनला आहे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. "मला देशातील तरुणांच्या क्षमतेवर, आत्मविश्वासावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आता ध्येय प्राप्त होत नाही तो पर्यंत थांबायचे नाही. भारत जरूर आत्मनिर्भर होईल," असे म्हणत मोंदींनी पुन्हा एकदा देशावासियांचे मनोधैर्य वाढवले आहे.


पंतप्रधान मोदींनी भाषणाच्या सुरुवातील सर्व देशबांधवांनी स्वातंत्र्यदिनाचा शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, आज स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत, त्यामागे माता भारतीच्या लाखो मुले व मुलींचे त्याग-बलिदान आणि समर्पण आहे. आज स्वातंत्र्यवीर, रणबांकुर यांना अभिवादन करण्याचा सण आहे. आपले सैन्य-निमलष्करी दले, पोलिस कर्मचारी, सुरक्षा दलांशी संबंधित प्रत्येकजण, भारतींच्या संरक्षणामध्ये व्यस्त आहेत. आज त्यांच्या सेवेलाही नमन करण्याचा दिवस आहे. आज अरविंद घोष यांची जयंती आहे. क्रांतिकारकापासून ते अध्यात्मिक ऋषी बनले. आज त्यांना स्मरण करण्याचा दिवस आहे. याचवेळी त्यांनी कोरोनाच्या संकटात खंबीरपणे लढणाऱ्या कोरोना वॉरियर्सला नमन केले.


‘आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यासाठी अनेक आव्हाने, जागतिक स्पर्धा आहेत. परंतु, देशवासियांची शक्ती एकवटली तर त्यातून कोट्यावधी उपाय मिळतील. त्यातून आपल्याला सामर्थ्य मिळेल,’ असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. परंतु, आधुनिक, नवीन आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून तीन दशकांनंतर नवीन शिक्षण धोरण सादर करण्यात आले आहे. दरम्यान आत्मनिर्भर भारत निर्मितीत महिलांना समान संधी उपलब्ध होतील, असे म्हणत त्यांनी या प्रक्रीयेत महिलांना सहभागी होण्यासाठी प्रेरित केले आहे.


पंतप्रधान मोदींनी यावेळी भारत-चीन मुद्द्यावरही भाष्य केले. ‘देशाच्या सार्वभौमत्वावर ज्यांनी डोळे वटारले त्यांना देशाच्या जवानांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिलेले आहे. सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आपले जवान काय करू शकतात हे जवानांनी लडाखमध्ये दाखवून दिले आहे’, असे नरेंद्र मोदींनी यावेळी म्हणाले. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे काम वेगात चालू आहे. लवकरच तिथे निवडणुका होऊन जम्मू-काश्मीरच्या लोकांना आपला आमदार, आपला मुख्यमंत्री मिळेल, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.


भारताने एकदा ठरवले, की भारत ते करुनच दाखवतो. त्यामुळेच आपण जेव्हा आत्मनिर्भर म्हणतो तेव्हा जगाला भारताकडून अपेक्षादेखील आहेत. आपल्याला आत्मनिर्भर भारतासाठी तयारी करायला हवी. युवकांनी भरलेला भारताला आत्मविश्वास कमवावा लागेल. कोरोनाच्या संकटकाळात अनेक गोष्टींसाठी आपल्याला आयात करण्याची वेळ आली. त्यावेळी देशात एन ९५, व्हेटिलेटर आणि अनेक गोष्टी बनायला लागल्या. आज भारत या गोष्टी जगात निर्यातही करु शकतो’, असे म्हणत मोदींनी भारत ‘आत्मनिर्भर’ बनत असल्याच्या मुद्द्याला अधोरेखित केले.




@@AUTHORINFO_V1@@