चला करूया मॅन्युफॅक्चरिंग ऑनलाईन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2020
Total Views |

Online_1  H x W

‘ऑनलाईन मॅन्युफॅक्चरिंग’च्या माध्यमातून भविष्यात भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात स्वदेशी वस्तू निर्माणाच्या माध्यमातून रोजगार तसेच देशांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.

 
 
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना मांडली. खरंतर जी आधीची ‘मेक इन इंडिया’ योजना आहे, त्यालाच ही एक प्रकारची दिलेली जोड म्हणावी लागेल. आपण एखाद्या वस्तूसाठी इतर देशांवर अवलंबून न राहता आपल्या देशात त्याचे उत्पन्न घेणे आणि मार्केट उपलब्ध करणे, म्हणजे एक प्रकारे ‘मेक इन इंडिया’च.
 
पण, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या संकल्पना यशस्वीपणे राबविण्यासाठी खरी गरज होती एका ‘सिस्टिम’ची. त्याचीच गरज ओळखून अनेक आयटी कंपन्यांनी कार्यविस्तार केला. ‘अ‍ॅमेझॉन’नंतर मग ‘फ्लिपकार्ट’, ‘शॉपकलूज’ अशा विविध ऑनलाईन खरेदी-विक्री करणार्‍या कंपन्या पुढे येऊ लागल्या. त्यामुळे लोकं वस्तू बनवून ‘डायरेक्ट’ ग्राहकांना विकू लागले. परिणामी, व्यापारी उलाढालही वाढली.
 
पण, यामध्ये एक असा गट आहे, जो स्वतः कुठल्याही वस्तू उत्पादित करत नाही, पण त्या सर्व वस्तू त्यांच्या ‘ब्रॅण्ड’ किंवा आपण म्हणू कंपनीच्या नावाखाली विकली जातात किंवा आपण असे म्हणू की, लोक ते विकत घेतात. उदाहरण द्यायचे झाली तर गोदरेज, महिंद्रा, टाटा, अ‍ॅपल आणि इतरही अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या जास्तीत जास्त वस्तू या दुसर्‍या कंपनीकडून तयार करुन घेतात. वर स्वतः फक्त ‘असेंबल’ व ‘टेस्टिंग’ करून विकतात. अशा कंपनीमध्ये एक ‘सबकॉन्ट्रॅक्टिंग’ किंवा ‘वेंडर डेव्हलपमेंट डिपार्टमेंट’ असते, जे ही सर्व प्रक्रिया अगदी सुरळीतपणे ‘मॅनेज’ करत असते. प्रत्येक वेळी नवीन डिझाईन, मटेरिअल, गुणवत्ता अशा वेळी नवीन ‘सप्लायर’ किंवा ‘वेंडर’ही लागत असतात, जे सर्व काही बनवून देतील, ते ही योग्य वेळेत, योग्य गुणवत्तेमध्ये आणि कमी किमतीत. आतापर्यंत ही सर्व ‘सबकॉन्ट्रॅक्टिंग’ किंवा ‘वेंडर डेव्हलपमेंट डिपार्टमेंट’ प्रकिया ही पारंपरिक पद्धतीनेच चालत असे. जसे की, मोठ्या कंपनी, त्यांची गरज ही त्यांच्या रजिस्टर कंपनीलाच जाते, तेच त्यांना वस्तू उत्पादित करुन देत असतात. यात नवीन लोकांना मोठ्या कंपनी बरोबर काम करणे किंवा त्यांच्याशी संपर्क करणे खूप कठीण असते.
 
जवळून पाहिले तर ‘मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री’मध्ये दोन गट आहेत, एक म्हणजे ब्रॅण्डेड मोठ्या कंपन्या आणि दुसर्‍या छोट्या कंपन्या, ज्या सर्व वस्तू बनवून मोठ्या कंपन्यांना देत असतात. या दोघांमध्ये मोठी दरी आहे आणि हीच दरी ओळखून, या दरीचे संधीत रूपांतर करायचं ठरवून ‘ऑनलाईन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’ची निर्मिती करण्यात आली.
 
ही एक अशी कंपनी आहे ज्यामध्ये, तुम्हाला कुढल्याही प्रकारची वस्तू किंवा पार्ट बनवून मिळू शकतो, तेही तुमच्या गरजेप्रमाणे म्हणजेच योग्य किंमतीत, योग्य गुणवत्तापूर्ण आणि वेळेत कोण बनवून देऊ शकेल हेदेखील कळते.
आतापर्यंत सर्व मोठ्या कंपन्या या ऑर्डर फक्त ओळखीचे जे उत्पादक आहेत, त्यांनाच देत होत्या आणि ज्यांची ओळख अशा मोठ्या कंपन्यांमध्ये आहे, तेच ऑर्डर घेत होते. पण, आता ‘ऑनलाईन मॅन्युफॅक्चरिंग’मुळे सर्व मोठ्या कंपन्या आणि सर्व प्रकारच्या छोट्या कंपन्या या थेट जोडल्या जात आहेत.
 
‘ऑनलाईन मॅन्युफॅक्चरिंगची खरी सुरुवात २०१७ मध्ये झाली, जेव्हा ‘ऑनलाईन मॅन्युफॅक्चरिंग’ कंपनीचे संस्थापक आणि सीईओ राजेंद्र गांगण हे ‘गोदरेज’मध्ये नोकरी करत होते. तिथे खूप सारे मशीनचे पार्ट हे बाहेरून बनवून आणले जात असत आणि त्यामध्ये गुणवत्ता आणि वेळेचा खूप अभाव होता. जेव्हा ‘सबकॉन्ट्रॅक्टिंग’ किंवा ‘वेंडर डेव्हलपमेंट डिपार्टमेंट’शी त्यांनी याबाबतीत चर्चा केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, ‘गोदरेज’सारखी कंपनी ही नवीन वेंडरच्या शोधात असते. पण, त्यांना योग्य मॅन्युफॅक्चरर भेटत नाहीत, जे त्यांना लागणारे पार्ट्स बनवून देऊ शकतील. तसेच जे छोटे मॅन्युफॅक्चरर आहेत तेही ‘गोदरेज’शी थेट जोडलेले नाही. याचे कारण म्हणजे, त्यासंबंधीच्या कुठल्याही विशिष्ट सिस्टिमचा अभाव.
 
स्वतः पेशाने ‘प्रोडक्शन इंजिनिअर’ असल्याने त्यांनी या गोष्टीवर काम करायचे ठरवले व गोदरेजची नोकरी सोडून पूर्णपणे उद्योगात आले. यात वेबसाईट बनवायला मंदार बेळणेकर यांनी मदत केली. तसेच जोडीला गौरव परब आणि विकी पाटील या मित्रांनी मिळून ही कंपनी उभी केली ती फेब्रुवारी २०१८ मध्ये. १८ फेब्रुवारी २०१८ मध्ये कंपनीची पहिले वेबपेज लॉन्च केलं.
 
जस जसे कंपनी पुढे जात होती, तसतसे कंपनीत, कामाच्या स्वरुपात खूप बदल होत गेले आणि लोकही ‘ऑनलाईन मॅन्युफॅक्चरिंग’ वापरायला लागले. खास करून गोदरेज, एल अ‍ॅण्ड टी, महिंद्रामधून छोट्या उत्पादकांना ऑर्डर मिळू लागल्या. आज ‘ऑनलाईन मॅन्युफॅक्चरिंग’ हा देशभरात ‘मॅन्युफॅक्चरिंग’ इंडस्ट्रीमध्ये परिचयाचा ‘ब्रॅण्ड’ झाला आहे, गेल्या अडीच वर्षांत कंपनीने छोट्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना कोट्यवधींचा बिझनेस उपलब्ध करून दिला आहे. तसेच मोठ्या कंपन्यांसाठीही नवीन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी शोधणे, सोपे झाले आहे. त्यामुळे मोठ्या कंपन्यांची कोट्यवधींची भांडवली गुंतवणुकीची बचत झाली आहे. ३०० पेक्षाही जास्त मोठ्या कंपन्या आज ‘ऑनलाईन मॅन्युफॅक्चरिंग’चा वापर करून इतर मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांचा शोध घेत आहेत. तसेच देशातील तसेच देशाबाहेरील हजारो छोट्या कंपन्या आज ‘ऑनलाईन मॅन्युफॅक्चरिंग’चा फायदा घेत आहेत.
 
त्यामुळे नवीन वेंडर किंवा मॅन्युफॅक्चरर शोधणे आता खूपच सोपे झाले आहे. ज्यांना फक्त नवीन वेंडर किंवा मॅन्युफॅक्चरर्सची गरज असेल, त्या कंपन्या ‘रिक्वेस्टर’ म्हणून जोडल्या जातात आणि ज्यांना त्यांच्याकडे असलेल्या मशीनस् आणि आवडीनुसार ऑर्डर्स हव्या आहेत, तसेच काही कामासाठी नवीन वेंडर किंवा मॅन्युफॅक्चरर हवे आहेत, त्या कंपन्या ‘मॅन्युफॅक्चरर’ किंवा ‘सर्व्हिस प्रोव्हायडर’ म्हणून जोडल्या जातात.
 
हे सगळं कसं करायचं, तर सुरुवातीला स्वतःचं अकाऊंट तयार करायचं. स्वतःची गरज ‘फाईंड वेंडर’वर जाऊन पोस्ट करायची. फॉर्ममधील सर्व माहिती भरून ते ‘सबमिट’ करायचे. मग आपसुकच तुमचे डिटेल्स कंपनीकडे येतात. कंपनी तुमच्या गरजेला मान्यता देते. त्यानंतर तुम्ही उपलब्ध वेंडर किंवा मॅन्युफॅक्चररची यादी पाहू शकता. यात तुमच्या इच्छेनुसार ठिकाण, त्यांच्या मशीन्स आणि क्षमता पाहून तुम्ही त्यांची निवड करु शकता व त्यांच्याकडून तुमच्या गरजेनुसार बजेटनुसार ऑर्डर देऊ शकता.
 
अशा प्रकारे आपण पाच ते सहा कंपन्यांकडून बजेट घेऊन योग्य प्रकारे वेंडर किंवा मॅन्युफॅक्चरर कंपनी शोधू शकता, जे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार पार्ट्स किंवा वस्तू बनवून देऊ शकतात आणि तुमची सुरुवातीची कोट्यवधींच्या गुंतवणुकीची बचत होऊ शकते. तुम्हाला कुठल्याही एका कंपनीवर अवलंबून राहावे लागत नाही, तर खूप सारे पर्याय तुमच्या समोर उपलब्ध होतात.
 
तसेच त्यांच्याकडे असलेल्या मशीन्स आणि आवडीनुसार ऑर्डर्स हव्या असतील, तसेच काही कामासाठी नवीन वेंडर किंवा मॅन्युफॅक्चरर हवे असतील, तर त्या कंपन्या मॅन्युफॅक्चरर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून जोडल्या जातात. अशा कंपन्या त्यांच्याकडे असलेल्या मशीन्स आणि प्रोसेसनुसार रजिस्टर होतात. त्यांच्यासाठी ‘रिक्वेस्ट रेझ इन माय इंडस्ट्री’ म्हणून पर्याय आहे, ज्यात ते मोठ्या कंपनीच्या आलेल्या ऑर्डर्स पाहू शकतात आणि त्यांना बजेट पाठवू शकतात. यात ज्यांची ‘रिक्वेस्ट’ आहे, त्या व्यक्तीचं नाव, कंपनीचं नाव, फोन नंबर, ईमेल आयडी व इतर सर्व माहिती दिलेली असते.
 
यामुळे ज्या कंपन्या ऑर्डर्स नसल्याने बंद होत होत्या, त्यांना आता नवनवीन ऑर्डर्स ‘ऑनलाईन मॅन्युफॅक्चरिंग’च्या माध्यमातून उपलब्ध होत आहेत.
 
आजकाल देशाबाहेरील बर्‍याच अशा कंपन्या आहेत, ज्यांना भारतातील कंपन्यांकडून माल बनवून घ्यायचा आहे, तसेच आपल्या देशातही खूप कंपन्या आहेत, ज्यांना ऑर्डर्स हव्या आहेत. या सर्वांसाठी हा एक उत्तम पर्याय आजकाल ठरत आहे. कारण, मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आज एका क्लिकवर उपलब्ध आहेत.
 
‘ऑनलाईन मॅन्युफॅक्चरिंग’ ही एक स्टार्टअप कंपनी आहे. ऑफिसची सुरुवात घरुन झाली होती आणि आज ‘बिझनेस इन्क्युबेशन सेंटर’मध्ये आहे. चार जणांची टीमपासून आज बारा जणांची टीम झाली आहे. टीममध्ये वरिष्ठ आणि अनुभवी लोक आहेत.
 
‘ऑनलाईन मॅन्युफॅक्चरिंग’ कंपनीला महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी प्रशंसापत्रक देऊन सन्मानितही केले आहे.
 
‘ऑनलाईन मॅन्युफॅक्चरिंग’च्या माध्यमातून भविष्यात भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात स्वदेशी वस्तू निर्माणाच्या माध्यमातून रोजगार तसेच देशांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.
 
कंपनीचं ‘मिशन’ आहे की, सर्व छोट्या कंपन्या या जीवित राहिल्या पाहिजेत आणि त्यांना संजीवनी देण्याचं काम कंपनीच्या माध्यमातून केले जात आहे. ७० टक्के रोजगाराच्या संधी या छोट्या उद्योगात निर्माण केल्या जातात. आपल्या भारतात जवळपास चार कोटी मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत. या सर्वांना एका व्यासपीठावर आणण्याचे काम आज ‘ऑनलाईन मॅन्युफॅक्चरिंग’च्या माध्यमातून करण्यात येत आहे.
 
आज जगात चीन ही सर्वात मोठी उत्पादनाची बाजारपेठ आहे. आपल्यालाही जर देशाची अर्थव्यवस्था सुधारायची असेल, तर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात उभी राहणे आवश्यक आहे आणि त्यासाठी ‘ऑनलाईन मॅन्युफॅक्चरिंग’च्या माध्यमातून एक प्रयत्न करण्यात येत आहे.
 
अधिक माहितीसाठी www.OnlineManufacturing.in वर संपर्क करा.
 
supportonlinemanufacturing.in वर ई-मेल करू शकता.

@@AUTHORINFO_V1@@