कोरोनानंतरच्या उपचारांसाठी केईएममध्ये ‘पोस्ट कोरोना ओपीडी’!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2020
Total Views |
post covid_1  H

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना जाणवतोय श्वसनाचा त्रास; सायन, नायरमध्येही सुरू होणार ‘पोस्ट कोरोना ओपीडी’



मुंबई : कोरोना मुक्तीनंतर पुन्हा कोरोनाची लागण होणाऱ्यांवर उपचार करण्यासाठी केईएम हॉस्पिटलमध्ये 'पोस्ट कोरोना ओपीडी' सुरू करण्यात आली आहे. अशा ओपीडी सायन, नायर रुग्णालयातही सुरू करण्यात येणार आहेत.


मुंबईत कोरोनातून बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. आतापर्यंत लाखाच्यावर रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही जणांना धाप लागणे, श्वास घेताना येणारा अवघडलेपणा, फुफ्फुसांच्या इतर समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, केईएममध्ये पोस्ट कोरोना ओपीडी पालिकेने सुरू केली आहे.


कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे मुंबईत आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त लोक कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, कोरोनामुक्त झाल्यानंतर काही जणांना अशक्तपणा, धाप लागणे, श्वास घेताना येणारा अवघडलेपणा तसेच फुफ्फुसासंबंधी इतर समस्या निर्माण झाल्या आहेत. केईएममध्ये ओपीडीच्या नियमित वेळेत ही ‘पोस्ट कोरोना ओपीडी’ सुरू असणार आहे. कोरोनानंतर अशा समस्या निर्माण होणा-यांवर उपचार केले जाणार आहेत. रुग्णांना येत असलेल्या समस्यांची माहिती घेऊन उपचार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. अशाच प्रकारच्या ओपीडी नायर व सायन रुग्णालयातही लवकरच सुरू होणार आहेत.







@@AUTHORINFO_V1@@