केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची कोरोनावर मात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2020
Total Views |

amit shah_1  H



नवी दिल्ली :
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोरोनावर मात केली असून शुक्रवारी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. २ ऑगस्टला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमित शहा यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. कोरोनाची काही प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर शहांनी टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. अमित शहा यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले होते. शुक्रवारी त्यांनी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे ट्विट केले.

ते म्हणाले,''आज माझी कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. मी देवाचे आभार मानतो आणि माझ्या प्रकृतीसाठी ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली व माझ्या कुटुंबीयांना धीर दिला त्यांचे मी मनापासून आभार मानतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आणखी काही दिवस मी होम आयसोलेशन मध्ये राहणार आहे.कोरोनाशी मुकाबला करण्याकरीता मला मदत करणाऱ्या आणि माझ्यावर उपचार करणाऱ्या मेदांता हॉस्पिटलातील सर्व डॉक्टर्स व स्टाफचेही आभार.''
@@AUTHORINFO_V1@@