करण जोहरचा ‘गुंजन सक्सेना’ वादाच्या भोवऱ्यात!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2020
Total Views |
Gunjan Saxena_1 &nbs


भारतीय हवाईदलाकडून करण जोहरसह सेन्सॉर बोर्डला पत्र! 

मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूरचा ‘गुंजन सक्सेना– द कारगिल गर्ल’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. मात्र प्रदर्शनाच्या दिवशीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील काही दृष्यांवर भारतीय हवाईदलाने आक्षेप नोंदवला आहे. याबाबत भारतीय हवाईदलाने यासंदर्भातील पत्र सेन्सॉर बोर्ड, धर्मा प्रोडक्शन कंपनी आणि नेटफ्लिक्सला पाठवण्यात आले आहे. या पत्रामध्ये चित्रपटांमधील काही दृष्यांबद्दल आक्षेप नोंदवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.


“भारतीय हवाईदलाच्या अधिकाऱ्यांनी अभ्रिप्राय देण्यासाठी पाठवण्यात आलेल्या चित्रपट पहिल्यानंतर या चित्रपटातील काही दृष्य, संवाद आणि ट्रेलरमधील काही भाग भारतीय हवाई दलाची नकारात्मक प्रतिमा तयार करत असल्याचे निर्दर्शनास आले आहे. गुंजन आपल्या कर्तृत्वाने हवाईदलात भरती होते खरी, पण ट्रेनिंग कॅम्पमध्ये गेल्यावर तिला तिथे बराच संघर्ष करावा लागला असे चित्रपटात आहे. ट्रेलरमध्येही ते दिसतं. यातून भारतीय हवाईदलाची नकारात्मक छबी निर्माण करण्यात आल्याचे हवाईदलाचे म्हणणे आहे. चित्रटातील मुख्य पात्राचे म्हणजेच फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांचे महत्व वाढवून दाखवण्यासाठी धर्मा प्रोडक्शनने काही घटना चुकीच्या पद्धतीने दाखवल्या आहेत. भारतीय हवाई दलामध्ये महिलांना देण्यात येणाऱ्या वागणूकीबद्दल चुकीचा संदेश यामध्यमातून दिला जातोय़,” असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.


हा चित्रपट बनवण्यापूर्वी करण जोहर यांनी भारतीय हवाईदलाच्या प्रतिष्ठेला कुठेही धक्का लागणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे भारतीय नौदलाने त्यांना ना हरकत दिली. पण आता या चित्रपटातून हवाई दलाबद्दल नकारात्मक बाबी समोर येत असल्याचे हवाईदलाने म्हंटले आहे.


कारगिल युद्धात गुंजन सक्सेना यांनी फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवले होते. लढाऊ विमान उडवणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला ठरल्या होत्या. त्यांच्या या साहसाची कथा चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. मात्र या चित्रपटातील काही दृष्यांवर आता भारतीय हवाई दलाने आक्षेप नोंदवला आहे.



@@AUTHORINFO_V1@@