फसलेली धर्मनिरपेक्षता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2020
Total Views |


Banglore_1  H x

 

 
 
 
बंगळुरुमधील काँग्रेस आमदाराच्या बंगल्यावर हल्ला करुन उसळलेली दंगल फसलेल्या धर्मनिरपेक्षतेचा नमुना असून वर्षानुवर्षे दाढ्या कुरवाळण्याचा उद्योग आज एका काँग्रेस आमदारावर उलटल्याचे दिसते. तसा तो उद्या मुस्लिमांचे लांगुलचालन करणार्‍या देशातल्या प्रत्येक टोळक्यावरही उलटू शकतो आणि तेव्हा मात्र त्यांनाही आमदार मूर्तीप्रमाणे कुठेतरी दडूनच बसावे लागेल, कारण फसवी धर्मनिरपेक्षता तेव्हा त्यांना वाचवायला येणार नाही.


 

कर्नाटकची राजधानी बंगळुरुचे नाव घेतले की, शांत, सुंदर आणि सुशिक्षित शहराचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, मंगळवारी रात्री हजारोंच्या संख्येने जमलेल्या धर्मांध मुस्लीम दंगलखोरांनी बंगळुरुला पेटवत शहराचे हे रुप विद्रूप, उद्ध्वस्त आणि नष्ट करण्याचा उद्योग केला. तत्पूर्वी काँग्रेसचे दलित आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या पी. नवीननामक पुतण्याने फेसबुकवर कथितरित्या मोहम्मद पैगंबरांबद्दल अवमानकारक लिखाण केल्याचे म्हटले जाते. पी. नवीन याच्या लिखाणाने बंगळुरुतील धर्मांध मुस्लीम समाज भडकला आणि हजारोंच्या संख्येने एकत्र येत, ‘अल्ला-हु-अकबर’च्या घोषणा देत या झुंडीने आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या बंगल्यावर हल्ला केला. दंगलखोरांनी यावेळी दगडफेक करत पेट्रोल बॉम्बचादेखील वापर केला आणि आमदाराच्या बंगल्यावर हल्ला करता करताच धर्मांधतेची नशा चढलेल्यांनी आजूबाजूच्या वाहनांना आणि घरांनाही लक्ष्य केले. दंगलखोरांनी एकूण पाच वेळा हल्ला केला व प्रत्येकवेळी हल्ल्यात सामील होणार्‍या धर्मांध मुस्लिमांची संख्यादेखील वाढत गेली. तसेच हिंसाचारात स्थानिकांव्यतिरिक्त बाहेरच्यांचाही मोठा सहभाग होता, जेणेकरुन त्यांची ओळख पटवता येऊ नये. नंतर चालू असलेला प्रकार रोखण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही जमावाने हल्ला केला, पोलिसांच्या गाड्यांची नासधुस-तोडफोड केली, तसेच जवळचे पोलीस ठाणे जाळण्याचा प्रयत्नही केला व यात ६० पेक्षा अधिक पोलीस जखमी झाले. मध्यरात्री २ वाजेपर्यंत ही धुमश्चक्री सुरु राहिली मात्र, परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत धर्मांध मुस्लिमांच्या झुंडीच्या झुंडी संबंधित परिसरात नंगानाच करतच होत्या. तद्नंतर जमावाला आवरण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला व यात तीन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आतापर्यंत या प्रकरणात ११० आरोपींना पकडण्यात आल्याचे वृत्त असून कर्नाटक सरकारने दंगलीतील नुकसानीची वसुली हल्लेखोरांकडून करण्याचे निश्चित केले आहे.

 


 
दरम्यान, बंगळुरुमध्ये गेल्या २५ वर्षांपासून असा दंगलीसारखा प्रकार झाला नव्हता, उलट ‘आयटी कॅपिटल’ म्हणून शहराची ओळख तयार झाली. तथापि, आताच्या घटनेने बंगळुरुसारख्या शहरातही इस्लामी धर्मांधतेचा ज्वालामुखी विद्यमान असल्याचे आणि छोट्याशा कारणावरुनही तो सारे काही बेचिराख करण्यासाठी उत्सुक, तत्पर असल्याचे स्पष्ट होते. मात्र, बंगळुरुतील दंगल एकाएकी घडल्याचे अजिबात दिसत नाही, तर ती पूर्वनियोजित षड्यंत्रातून प्रत्यक्षात आल्याचे समजते. कारण, मोहम्मद पैगंबरांबद्दल फेसबुकवर पोस्ट लिहिल्याची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या एका तासात सुमारे ५ हजार ते १० हजार आणि काही प्रत्यक्षदर्शी व माध्यमांच्या मते, ६० हजार धर्मांध मुस्लीमांचा जमाव एकत्र आल्याचे म्हटले जाते. कितीही काही झाले तरी किमान वेळेत इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक गोळा होणे शक्य नाही आणि म्हणूनच ही साधी बाब ठरत नाही, तर हे ठरवून केलेले कृत्य असल्याचे दिसते. उल्लेखनीय म्हणजे, तपास यंत्रणांनी अटक केलेल्यांत सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’चा (एसडीपीआय) नेता मुजम्मिल पाशा याचा समावेश असून ‘एसडीपीआय’ ही ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची (पीएफआय) राजकीय शाखा आहे. ‘पीएफआय’ कट्टर इस्लामी संघटना असून ‘सीएए-एनआरसी’विरोधी आंदोलनासाठी तिने पुढाकार घेतला होता. तसेच दिल्ली दंगलीत सामील असल्याचा व दंगलीसाठी आर्थिक रसद पुरवल्याचा आरोप ‘पीएफआय’वर आहे. अशा संघटनेचा नेता बंगळुरुतील दंगलीत आरोपी आहे आणि म्हणूनच हा प्रकार अचानक घडल्याचे मान्य करता येत नाही.
 

 


दरम्यान, बंगळुरुमध्ये धर्मांध मुस्लिमांच्या झुंडीने इतक्या मोठ्या प्रमाणावर उपद्रव माजवला तरी काँग्रेस, कम्युनिस्ट, तथाकथित धर्मनिरपेक्षी-उदारमतवादी-अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादी, बुद्धिजीवी वगैरे वगैरे कळपांत चिडीचूप शांतता आहे. अखंड श्रीनिवास मूर्ती काँग्रेस आमदार असूनही त्यांच्या स्वतःच्याच पक्षाने दंगलखोरांचा उघडपणे विरोध केला नाही. उलट कोणत्याही लहानसहान घटनेवरुन मोदी सरकार वा योगी सरकारविरोधात बडबड करणार्‍या राहुल गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा आणि सोनिया गांधी यांची वाचा बसली. म्हणजेच मुस्लीम तुष्टीकरणापायी काँग्रेसने आपल्याच आमदाराला वार्‍यावर सोडल्याचे व तो जगला काय-मेला काय, त्याची आपल्याला फिकीर नसल्याचे दाखवून दिले. कारण, धर्मांध मुस्लीम झुंडीची आमदाराला मारण्याचीच योजना होती, पण ते बंगल्यात हजर नसल्यानेच वाचले. तसेच हिंदू देवी-देवतांवर दिवस उजाडला की, चिखलफेक करणार्‍या डाव्या-अभिव्यक्तिस्वातंत्र्यवाल्यांनाही इथे काहीही वावगे वाटले नाही. मोहम्मद पैगंबरांबद्दल संबंधित व्यक्तीने काही लिहिले असेल तर त्यांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणत त्याचे समर्थन केले नाही. तसेच दगडफेक, जाळपोळ आणि युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होऊनही कोणी इस्लामी दहशतवादाच्या, इस्लामी असहिष्णुतेच्या नावाने बोंब ठोकली नाही. मात्र, हीच मंडळी हिंदुंनी एखादा शब्द उच्चारला वा ट्विट केले तरी पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे भुंकू लागतात. हिंदूंना असहिष्णू ठरवण्यासाठी आघाडी उघडतात, तुटून पडतात. इतकेच नव्हे तर ‘जय भीम-जय मीम’चा नारा देणार्‍यांनीही एका दलित आमदाराच्या घरावर धर्मांध मुस्लिमांच्या झुंडीने हल्ला केला तरी ‘एल्गाराची डफली’ वाजवली नाही, उलट भाईचार्‍याचा तोबरा भरुन गप्प बसणेच पसंत केले.

 


 
दरम्यान, गेल्याच महिन्यात अकोला जिल्ह्यातील माऊंट कारमेल शाळेतील सुनिता जोसेफ नामक शिक्षिकेने शाळेच्या अधिकृत ऑनलाईन शिक्षणविषयक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर एक कुत्रा रानातील उघड्या चौथर्‍यावरील महादेवाच्या पिंडीवर मूत्रविसर्जन करत असल्याचे छायाचित्र पसरवले होते. तसेच कुत्र्याला हा दगड असल्याचा विश्वास वाटतो, पण भारतीयांना ते कळत नसल्याचे लिहिले होते. मात्र, त्यानंतर ग्रुपमधील हिंदूंनी व हा प्रकार सार्वजनिक झाल्यावर राज्यातील हिंदूंनीही त्याचा सनदशीर मार्गानेच विरोध केला, कोणीही कायदा हातात घेतला नाही. ही हिंदूंची सहिष्णुताच होती आणि पी. नवीन याने मोहम्मद पैगंबरांबद्दल अवमानकारक पोस्ट केली असेल, तर त्याचा विरोधही मुस्लिमांना कायदेशीररित्या नक्कीच करता आला असता. पण, त्यांनी तसे न करता कायदा हातात घेत, दंगल घडवली, हिंसाचार केला आणि मुस्लिमांनी इतके करुनही त्याविरोधात छद्म धर्मनिरपेक्षतावादी-उदारमतवाद्यांनी चकार शब्द काढला नाही. अर्थातच हे सारे मुस्लिमांना काय वाटेल, या एकाच विचाराने व मुस्लिमांची मतपेटी जपण्याच्या उद्देशाने होत असून हिंदूंच्या भावनेला अथवा जीवाला मग तो आपल्यातला असला तरी आपण कवडीचीही किंमत देत नसल्याचेच यातून ही मंडळी दाखवून देत असल्याचे समजते. तसेच हा फसलेल्या धर्मनिरपेक्षतेचा शिरसारी आणणारा प्रकार असून यामुळेच धर्मांध मुस्लिमांना छोट्या छोट्या कारणांवरुनही रस्त्यावर उतरण्यासाठी, नासधुस करण्यासाठी व दंगलीसाठी चेव चढत असल्याचे स्पष्ट होते. मात्र, हा दाढी कुरवाळण्याचा प्रकार आज एका काँग्रेस आमदारावर उलटला, तसा तो उद्या मुस्लिमांचे लांगूलचालन करणार्‍या देशातल्या प्रत्येक टोळक्यांवरही उलटू शकतो आणि तेव्हा त्यांनाही आमदार मूर्तीप्रमाणे कुठेतरी दडूनच बसावे लागेल. कारण, फसवी धर्मनिरपेक्षता तेव्हा वाचवायला येणार नाही.

 

 
@@AUTHORINFO_V1@@