लसीमुळे पुतीन यांच्या मुलीच्या शरीरात तयार झाल्या 'अँटीबॉडीज्' !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2020
Total Views |
vaccine of Russia _1 
 

 

मॉस्को : अधिकृतरित्या कोरोनावर लस नोंदणी करणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे. कोरोना विषाणूचा पहिला डोस हा राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या मुलीला दिला आहे. त्यांना दोन डोस दिले आहेत. मात्र, यानंतर शरीराचे तापमान वाढल्याचीही माहिती आहे. पहिल्या लसीकरणानंतर शरीराचे तापमान ३८ अंश सेल्सिअस होते तर दुसऱ्या लसीनंतर ते ३७ वर आले आहे. काही वेळाने शरीराचे तापमान सामान्य होत आहे.
दोन पैकी कुठल्या मुलीला लस दिली याबद्दल अद्याप माहिती नाही. मारीया आणि कॅटरीना, अशी पुतीन यांच्या मुलींची नावे आहेत. लसीकरणानंतर तिला बरे वाटत आहे, असे त्यांनी सांगितले. तिच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज् तयार होत आहेत. कोरोनाच्या लसीवर यापूर्वी बऱ्याच चाचण्या केल्या आहेत आणि यात लस सुरक्षित सिद्ध झाली आहे.
 

vaccine of Russia _2 

रशियाचे आरोग्य मंत्री मिखाईल मुराश्को यांनी जगभरातील २० देशांनी या लसीची मागणी केल्याचा दावा केला आहे. स्पुतनिक-वी, असे या लसीचे नाव आहे. रशिया या लसीवर थेट गुंतवणूक करण्यासाठी व इतर देशांना विक्रीसाठी तयारी करत आहे. रशियाच्या वेबसाईटने केलेल्या दाव्यानुसार, भारतासह सौदी अरब, इंडोनेशिया, फिलिपिंस, ब्राझील, मेक्सिको आदी देशांनी ही लस खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावा केला आहे.
 
 
रशियाने २०२० या वर्षाअखेर कोरोना लसीचे एकूण २० कोटी डोस तयार करण्याची योजना आखण्यात येणार आहे. यातील ३ कोटी डोस हे स्वतःसाठी ठेवणार आहे. लसीचे उत्पादन सप्टेंबरमध्ये सुरू केले जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात अन्य देशांमध्ये याची चाचणी करण्याचा विचार आहे. यात भारतासह सौदी अरब, ब्राझील आदी देशांचा सामावेश आहे.



@@AUTHORINFO_V1@@