पुलवामात सुरक्षादलाकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2020
Total Views |
pulwama_1  H x


दहशतवाद्यांशी चकमकीदरम्यान एक जवान शहीद!

पुलवामा : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील कामराजीपोरा भागात बुधवारी सुरक्षा दलाच्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले आहे. दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यानंतर सैन्य घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे.


लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सने सीआरपीएफसमवेत ही शोध मोहीम सुरू केली आहे. सध्या या परिसराला घेराव घालण्यात आला आहे आणि दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याचा मृतदेह सुरक्षा दलाने ताब्यात घेतला आहे. चकमकीत एक सैनिक जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी ९२ बेस हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नेण्यात आले आहे.


जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवारी कुपवाडा येथून हिजबुल मुजाहिद्दीनच्या ४ अतिरेक्यांना अटक करण्यात आली होती. परवेज अहमद भट, अल्ताफ अहमद मीर, गुलाम मोहम्मद गुजर आणि अब्दुल कय्यूम अशी त्यांची नावे आहेत. ताब्यात घेतलेल्या अतिरेक्यांकडून एके ४७ राइफल, २ पिस्तूल आणि गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या.




@@AUTHORINFO_V1@@