पार्थ पवारांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही : शरद पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2020
Total Views |
Sushant Singh Rajput_1&nb
 


मुंबई : सुशांत सिंह प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांच प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी त्यांनी आपला नातू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केलेल्या सीबीआय चौकशीच्या मागणीवरूनही समाचार घेतला आहे. पार्थ यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही, त्यांची राजकीय कारकीर्द अपरिपक्व आहे, असे विधान पवारांनी केले आहे.
 
 
 
 
सुशांत सिंह प्रकरणावर खासदार संजय राऊत आणि पवार यांच्यात मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे बैठक पार पडली. यानंतर त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. पार्थ यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. पवारांच्या या प्रतिक्रीयेवर खासदार सुप्रिया सुळे व खुद्द पार्थ यांनी प्रतिक्रीया देण्यास नकार दिला आहे.
 
 
 
"मुंबई पोलीसांचे काम मी पूर्वीपासून पाहत आलो आहे. ते अशा प्रकरणांत अनुभवी आहेत, त्यामुळे पोलीसांवर पूर्ण विश्वास आहे. कुणाला जर सीबीआय चौकशी करायची असेल तर त्याला विरोध नाही. एका अभिनेत्याने आत्महत्याने केली त्याला इतके महत्व का शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर कुणी इतके प्रश्न का विचारत नाहीत, असेही ते म्हणाले.



पार्थ पवार यांनी विरोधी पक्ष नेत्यांकडून सीबीआय चौकशीची मागणी होण्यापूर्वीच सीबीआय चौकशीची मागणी केली होती. दुसरीकडे ५ ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमिपूजनावेळीही त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या होत्या. यावरूनही सुप्रिया सुळे यांनी त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आता पवारांनी केलेल्या विधानाला विविध कंगोरे समोर येत आहेत.
पार्थ पवारांच्या अशा भूमिकांमुळेच त्यांना पक्षात अशी वागणूक दिली जात आहे का, असाही प्रश्न विचारला जात आहे. पार्थ पवार यांना राष्ट्रवादीतर्फे यापूर्वी मावळ मतदार संघातून लोकसभेचे तिकीटही देण्यात आले होते. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.



@@AUTHORINFO_V1@@