बंगळुरुतील हिंसाचारात ६० पोलीस जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2020
Total Views |

Banglore_1  H x
बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये मंगळवारी रात्री उफाळलेल्या हिंसाचारात ६० पोलीस कर्मचारी जखमी झाले. तर या घटनेत आत्तापर्यंत तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे. एका फेसबुक पोस्टवरून धार्मिक भावना दुखावल्या म्हणून आमदारांच्या घरावर हल्ला करणार्याु जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार श्रीनिवास मूर्ती यांचा भाचा असलेल्या नवीन याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या. यासाठी नवीनला अटक करण्यात आली आहे.
 
 
हिंसाचारादरम्यान जमावाने आमदारांच्या घरापासून गाड्यांपर्यंत अनेक वस्तूंची तोडफोड केली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बेंगळुरूत जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे. तर हिंसा घडलेल्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या हिंसाचारात जवळपास १०० पोलिसही जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत ११० जणांना अटक केली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@