गुड न्यूज ! 'कोरोना'वर लस शोधण्यात रशियाची आघाडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2020
Total Views |

putin_1  H x W:


मॉस्को :
‘कोरोना’वर लस शोधण्याचे जगभर प्रयत्न सुरु असताना रशियाने आघाडी घेतल्याचे दिसत आहे. ‘कोविड१९’ वरील लसीची नोंदणी करणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी यासंदर्भात घोषणा केली.


‘कोविड१९’ वरील लसीची नोंदणी करणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे, असे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी एका सरकारी बैठकीत जाहीर केले. पुतीन यांच्या कन्येनेही ही लस घेतल्याची माहिती आहे.पुतीन यांनी आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांना या लसीबद्दल माहिती देण्यास सांगितले. ही लस प्रभावी ठरते आणि स्थिर प्रतिकार शक्ती (stable immunity) निर्माण करते. ही लस जगातील पहिली यशस्वी कोरोना व्हायरसवरील वॅक्सिन असून याला रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. असा दावाही पुतीन यांनी केला आहे.


दरम्यान, जगभरात कोरोनावर यशस्वी लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्या लसींचे क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, १०० हून अधिक वॅक्सिन तयार करण्याचे काम सुरु आहे. ज्यामध्ये अमेरिका, ब्रिटन, इज्राइल, चीन, रशिया, भारत यांसारख्या देशांचा समावेश आहे. भारतात कोरोना व्हायरस वॅक्सिनचं ह्युमन ट्रायल सुरु आहे. हे वॅक्सिन सध्या दुसऱ्या स्टेजमध्ये आहे. रशियाने केलेली ही घोषणा खरी ठरली आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून या वॅक्सिनला मंजूरी मिळाली. तर जगभरातील सर्व लोकांसाठी ही आनंदाची बाब आहे.



'कोविड १९'वरील पहिल्या चाचणीची निर्मिती


कोरोना व्हायरसवरील रशियाची पहिली लस गॅमलेया संशोधन संस्था आणि रशियन संरक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे विकसित केली आहे. या लसीच्या वैद्यकीय चाचण्या १८ जून रोजी सुरु करण्यात आल्या होत्या. चाचणीत सहभागी झालेल्या सर्व ३८ स्वयंसेवकांनी प्रतिकारशक्ती विकसित केल्याची माहिती आहे. पुतीन यांनी पुढे कोरोनावरील पहिल्या लसीवर काम केलेल्या प्रत्येकाचे आभार मानले. जगासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
@@AUTHORINFO_V1@@