बेरूत स्फोट : लेबनानच्या पंतप्रधानांसह मंत्रिमंडळाचा राजीनामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2020
Total Views |

लेबनॉन पंतप्रधान _1 


बेरूत :
लेबनानचे पंतप्रधान हसन दियाब यांनी राजधानी बेरुतमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटानंतर मंत्रिमंडळासह सामूहिक राजीनामा दिला आहे. लेबनानाच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर जनतेला संबोधित करत आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.


लेबनानची राजधानी बेरुतमध्ये शक्तिशाली स्फोट झाला. अनेक वर्षांपासून बंदरावर असुरक्षित पद्धतीने ठेवलेल्या २७५०टन अमोनियम नायट्रेटचा मागील मंगळवारी स्फोट झाला. या स्फोटाची भीषणता इतकी होती की त्यात आतापर्यंत २२० लोकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. हसन दियाब म्हणाले, “मी एक पाऊल मागे टाकत आहे. त्यामुळे मला लोकांसोबत त्यांच्या बदलाच्या लढाईत सहभागी होता येईल. मी आज या सरकारमधील माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. ईश्वर लेबनानला सुरक्षित ठेवो.” बेरुतमधील या स्फोटानंतर लेबनानच्या नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळाला.



नागरिकांनी याला सरकारचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे सांगत पंतप्रधानांसह मंत्रिमंडळाच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सरकारवर अकार्यक्षम असल्याचाही आरोप झाला. त्याविरोधात लाखो लेबनन नागरिकांनी रस्त्यावर उतरुन सरकारचा जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली. यातून लेबनान सरकारवर मोठा दबाव वाढला होता.त्यांनी आपला राजीनामा लेबनॉनचे राष्ट्रपती मायकल आऊन यांच्याकडे सोपवला आहे. दरम्यान, नवी मंत्रिमंडळाची स्थापना होईपर्यंत पदावर कायम राहा, असं राष्ट्रपतींनी पंतप्रधान हसन दियाब यांना सांगितले आहे. दरम्यान लेबनॉनला मोठया आर्थिक संकटांचाही सामना करावा लागत आहे. हे संकट पाहता संयुक्त राष्ट्राच्या यंत्रणाही मदत करत आहेत. तर फ्रान्सचे राष्ट्रपती इम्युएनल मॅक्रों यांच्या नेतृत्त्वात आंतरराष्ट्रीय समूहाने लेबनॉनला २९.७ कोटी डॉलरची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
@@AUTHORINFO_V1@@