छेडछाडीपासून वाचण्याच्या प्रयत्नात तरुणीचा अपघाती मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Aug-2020
Total Views |

sudiksha bhati_1 &nb
लखनौ : अमेरिकेत उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात बुलेटस्वारांकडून झालेल्या छेडछाड आणि पाठलागात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदीक्षा भाटी असं या तरुणीचे नाव आहे. तिला उच्च शिक्षणासाठी एचसीएलकडून तब्बल ३.८० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती. ती नुकतीच काही दिवस सुट्टीवर आली असताना तिचा अपघातात मृत्यू झाला. काही बुलेटस्वारांनी सुदीक्षाचा पाठलाग केल्यानंतर हा अपघात झाला. पोलिसांनी अज्ञात दुचाकीचालकांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला.

मिळालेल्या माहितीनुसार, सुदीक्षा अमेरिकेतील बॉब्सन येथे शिक्षण घेत होती. यासाठी तिला ३.८० कोटी रुपयांची विशेष स्कॉलरशीपही मिळाली. नुकतीच काही दिवस सुट्टीसाठी ती भारतात आली होती. ती आपल्या काकांसोबत औरंगाबादला मामांच्या घरी जात होती. त्यावेळी काही बुलेटस्वारांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. याच दरम्यानच्या गोंधळात सुदीक्षाच्या गाडीचा अपघात झाला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. सुदीक्षा गौतमबुद्ध नगरमधील दादरी येथे राहत होती. ती अत्यंत गरीब कुटुंबातून पुढे आली. ती शैक्षणिकदृष्ट्या अतिशय हुशार मुलगी होती. तिचे वडील ढाबा चालवतात. सुदीक्षाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच झाले. त्यानंतर विशेष प्रवेश परीक्षेतून तिला एचसीएलच्या मालिक शिव नदार (सिकंदराबाद) शाळेत प्रवेश मिळाला. सुदीक्षाने १२ वीमध्ये जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तिची निवड अमेरिकेतील एका कॉलेजमध्ये झाली.

सुदीक्षा भाटीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे, “आम्ही बाईकवरुन औरंगाबादला जात होतो. त्यावेळी आमच्या गाडीचा बुलेटवर असलेल्या दोन युवकांनी पाठलाग गेला. ते कधी आपली बुलेट पुढे न्यायचे तर कधी सुदीक्षावर शेरेबाजी करायचे. इतकंच नाही तर ते बुलेटचे स्टंटही करत होते. हेच करत असताना त्या बुलेटस्वारांनी आमच्या गाडीच्या समोर येऊन अचानक बुलेटचा ब्रेक दाबला. त्यामुळे आमच्या बाईकची बुलेटला धडक बसली.” यात सुदीक्षा गंभीर जखमी झाली. तिचा जागेवरच मृत्यू झाला. तिच्या कुटुंबाने दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@