हॉटेल्समध्ये काय सुरू काय बंद! वाचा सविस्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2020
Total Views |

hotels _1  H x



नवी दिल्ली
: अनलॉकनंतर देशातील ३ आणि ५ स्टार हॉटेल्स सुरू झाले आहेत. मात्र, पूर्वीप्रमाणे कार्यरत नाहीत. कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. ग्राहकही कमी आणि सेवाही कमीच आहे. तसेच ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधांमध्येही कपात करण्यात आली आहे. लिफ्टमध्ये केवळ दोघांना प्रवेश असेल. ग्राहकांना मास्क आणि सॅनिटायझर मोफत दिले जाणार आहेत.
 
बुफे पद्धत बंद

हॉटेल्समध्ये बुफे जेवणाची पद्धत बंद करण्यात आली आहे. ग्राहकांना आता रुममध्ये जेवण, नाश्ता आणि इतर गोष्टी मिळणार आहेत. रेस्टॉरंट केवळ पाहुण्यांच्या जेवणासाठी सुरू आहे. खुल्या जागेत कुठेही जेवणाची सोय नाही. तसेच मोठ्य़ा प्रकारचे इव्हेंट्स किंवा अन्य कुठल्याही प्रकारे एकत्र येऊन कार्यक्रम साजरे करण्यास परवानगी दिलेली नाही. केवळ निमंत्रित पाहुणे आणि कमी संख्येत लग्न किंवा आणि साखरपुडा यांसारखे कार्यक्रम साजरे केले जाऊ शकतात.
 
पूल, स्पा बंद

एका ५ स्टार हॉटेल अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील संबंधित संपूर्ण हॉटेल शृंखला ही मार्गदर्शक तत्वे पाळत आहे. तसेच स्पा आणि स्विमिंग पूलही बंद करण्यात आले आहेत. टेबल्सही कमी करण्यात आले आहेत. अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन दिले जात आहे. ग्राहकांच्या वस्तूही निर्जंतूकीत केल्या जात आहेत. स्पा, स्वीमिंग पूल आदी ठिकाणे जिथे लोक एकत्र येऊ शकतात, अशा गोष्टी बंद ठेवण्यात आल्या आहेत. काही राज्यांमध्ये स्पा चालू आहेत, मात्र, त्यावरही निर्बंध आहेत.
 
स्वच्छ आहार पोहोचवण्याचा प्रयत्न

दिल्लीमध्ये अशाच प्रकारे ग्राहकांना नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण रुममध्येच दिले जात आहे. जेवण संपूर्णपणे सुरक्षित आणि झाकून ग्राहकांना दिले जात आहे. तसेच मास्क आणि सॅनिटायझर मोफत दिले जात आहे. जेवणाची ऑर्डर देण्यासाठीही क्यूआर कोडचा पर्याय देण्यात आला आहे. कॅशिअर आणि बिलिंग काऊंटरवरही काचेचे आवरण बसवण्यात आले आहे.
 
 
OYO रुम्स मध्ये काय मिळते सुविधा ?

• बॅग्स सॅनिटायझेशन केले जाते

• सुरक्षारक्षकांद्वारे ग्राहकाचे तापमान तपासणी

• सोशल डिस्टंसिंगचे निर्देश

• डिजिटल पेमेंट देण्यासाठी प्रोत्साहन

• एलिव्हेटर बटण सॅनिटायझेशन

• बेडरुममध्ये निर्जंतूकीकरण केल्यानंतर स्टीकर्स

• १०-१५ टक्के सवलत कायम

• ५ स्टार हॉटेल्सच्या किंमतीत कुठलीही वाढ नाही

• ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य

 
व्यावसायाची घडी बसवण्याचे आवाहन

हॉटेल्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊन आणि कोरोनामुळे ३३ टक्के ग्राहकांनाच जागा उपलब्ध करून देण्यात येईल. दरम्यान, कोरोनामुळे तितकेही ग्राहक सध्या नाहीत. १२-१३ टक्के ग्राहकांची रेलचेल आहे. जोपर्यंत विमानसेवा पूर्ववत सुरू होत नाही तोपर्यंत ग्राहकांचा ओढा कमीच असेल. या व्यवसायाला सावरण्यासाठी पुढील दोन ते तीन वर्षे जातूल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पूर्वीपासूनच तोट्यात सुरू असलेल्या या कंपनीला आता लॉकडाऊनमध्ये आणखी हाल सहन करावे लागत आहेत.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@