बंद पॉलीसी सुरू करण्याची संधी ! अंतिम मुदत...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2020
Total Views |
LIC_1  H x W: 0
 
 


नवी दिल्ली
: कुठल्याही कारणास्तव तुमची एलआयसी विमा पॉलीसी लॅप्स (हप्ते न भरल्याने बंद) झाली असल्यास, अशा पॉलीसी पुन्हा सुरू करण्याची संधी एलआयसीने पॉलीसीधारकांना दिली आहे. मात्र, यासाठी अंतिम मुदत ९ ऑक्टोबर २०२० ही असणार आहे. त्यापूर्वी एलआयसीच्या शाखेत जाऊन याबद्दलची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
 
 
दंडामध्ये ३० टक्के सवलत

उशीरा भरलेल्या हप्त्यांवर एकूण ३० टक्के सवलत मिळणार आहे. अंतिम प्रीमिअम भरणा पाच वर्षांच्या आत असेल त्यांनाच सवलत मिळणार आहे. विमाधारकांना ३० टक्क्यांपर्यंत शुल्कआकारणीत सवलत मिळणार आहे. १ लाखांपर्यंतच्या दंडावर २० टक्के सुट मिळणार आहे. १ ते ३ लाखांपर्यंतच्या शुल्कावर २५ टक्के दंडात सवलत मिळेल. ३ लाखांपेक्षा जास्त शुल्कावर ३० टक्क्यांपर्यंत सुट मिळणार आहे.
 
 
२०१९-२० वर्षात विमा हप्त्यात वाढ

एलआयसीतर्फे २०१९-२० या वर्षात प्रीमिअममध्ये २५.२ टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. एलआयसीमध्ये ७५.९० टक्के हिस्सेदारीसह बाजारात सर्वोच्च स्थानी आहे. एलआयसीमध्ये एकूण २० लाख कोटींची गुंतवणूक आहे. देशातील सर्वाधिक गुंतवणूक कंपनी मानली जाते. २०१९-२० या वर्षांत निव्वळ नफा हा २.६ लाख कोटी रुपये इतका होता. अन्य कुठल्याही कंपन्यांपेक्षा तो जास्त आहे.




@@AUTHORINFO_V1@@