देशभरात कोरोनाचे १५ लाख रुग्ण बरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2020
Total Views |

Corona Test _1  
 



नवी दिल्ली : भारतात कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता आता बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर दिलासाही मिळत आहे, देशात बरे होऊन घरी गेलेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या १५ लाख इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबद्दलची माहिती दिली आहे. त्यानुसार, १० राज्यांमध्ये ८० टक्के कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. तसेच गेल्या २४ तासांत कोरोनाचे एकूण ६२ हजार ६४ रुग्ण आढळले आहेत. तर एकूण १००७ जणांचा यात मृत्यू झाला आहे. 
 
२४ तासांत एकूण ४ लाख ७७ हजार २३ इतक्या चाचण्या केल्या आहेत. सलग चौथ्या दिवशी ६० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयानुसार देशात आत्तापर्यंत कोरोनाचा आकडा एकूण २२ लाख १५,०७५ वर पोहोचला आहे. यात ६ लाख ३४,९४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १५ लाख ३५, ७४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत एकूण ४४ हजार ३८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना चाचण्यांची संख्या २ कोटी ४५ लाख ८३ हजार ५५८ इतकी झाली आहे. भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर हा ६९.३३ टक्के इतका झाला आहे. मृत्यूदर हा २ टक्के आहे.
 
राज्यात १ लाख ४७ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता १७ हजार ३३२ वर पोहोचली आहे. त्यापैकी एक लाख ४७ हजार ८५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तीन लाख १७ हजार ७५७ रुग्ण बरे झाले आहेत. १७ हजार ७५७ जणांचा मृत्यू झाला आहे.
 
तामिळनाडूत दोन लाख ९६ हजार ९०१ रुग्ण
तामिळनाडूमध्ये दोन लाख ९६ हजार ९०१ रुग्ण रुग्ण आढळले आहेत. तिथे ५३ हजार ३३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दोन लाख ३८ हजार ६३८ रुग्ण बरे झाले आहेत. ४९२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
 
आंध्रप्रदेशात ८७ हजार ११२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
आंध्रप्रदेशात दोन लाख २७ हजार ८६० कोरोना रुग्ण आढळले. तिथे ८६ हजार ११२ कोरोना रुग्ण आहेत. एक लाख ३८ हजार ७१२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर २ हजार ३६ लोकांचा मृत्यू झाला आहे.
 
 
कर्नाटकमध्ये १ लाख ७८ हजार ८७ रुग्ण
कर्नाटकमध्ये १ लाख ७८ हजार ८७ रुग्ण आढळले आहेत. तिथे ८० हजार ९८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ९३ हजार ९०८ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ३१९८ कोरोना मृत्यू झाले आहेत.
 
 
उत्तर प्रदेशात ४८ हजार ८९० रुग्णांवर उपचार सुरू
योगी सरकारच्या राज्यात उत्तर प्रदेशमध्ये एकूण १ लाख १८ हजारांवर कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर आत्तापर्यंत ६९ हजार ८३३ रुग्ण बरे झाले आहेत. २ हजारक २८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ४८ हजार ८९० जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.
 
 
दिल्लीत कोरोनाचे १ लाख ४५ ४२७ रुग्ण
दिल्लीत कोरोनाचे १ लाख ४५ ४२७ रुग्ण आढळले आहेत. यापैकी एकूण १० हजार ७२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एक लाख ५८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण मृत्यू ४ हजार १११ इतके झाले आहेत.




@@AUTHORINFO_V1@@