प्रायोजकत्वाच्या पडद्याआड...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2020
Total Views |


IPL 2020_1  H x
 


कोरोना संकट काळात आर्थिक घडी सावरण्यासाठी प्रत्येक कंपन्यांना कसरत करावी लागत असतानाच गल्वान खोर्‍यातील संघर्षानंतर नागरिकांनी उत्पादनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती कंपन्यांची झाली आहे. भारतीय नागरिकांची चिनी उत्पादनावर बहिष्कार घालण्याची मानसिकता असताना हजारो कोट्यवधी रुपये कंपनीच्या प्रचारासाठी का वाया घालवायचे, असा प्रश्न कोणत्याही कंपनीचे व्यवस्थापकांना पडणारच. त्यामुळे कंपनीनेच वर्षभरासाठी हा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे क्रिकेट समीक्षकांचे म्हणणे आहे.

 
 

इंडियन प्रीमिअर लीग’ (आयपीएल) या जगप्रसिद्ध स्पर्धेचा यंदाचा प्रायोजक (स्पॉन्सरशिप) कोण होणार याबाबतचा निर्णय झाला नसला तरी याबाबतची उत्सुकता स्पर्धेच्या आयोजकांपासून ते खेळाडू आणि चाहत्यांपर्यंत कायम आहे. भारत आणि चीन यांच्यात गलवान खोर्‍यातील संघर्षानंतर तयार झालेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) ‘आयपीएल’च्या तेराव्या हंगामासाठी ‘विवो’ कंपनीसोबतचा करार स्थगित करण्याबाबत दबाव होता. गलवान खोर्‍यातील संघर्षानंतरही ‘बीसीसीआय’ने करार स्थगित न करण्याचीच भूमिका घेतली होती. तसे स्पष्टीकरणदेखील मंडळाने दिले होते. मात्र, ‘बीसीसीआय’ने याबाबतचा निर्णय घेण्याआधीच ‘विवो’ कंपनीने हा करार वर्षभरासाठी स्थगित करत असल्याचे जाहीर केले. कंपनीचा या निर्णयाचे अनेकांना नवल वाटले. ज्या कंपनीने पाच वर्षांच्या करारासाठी जवळपास सर्वाधिक दोन हजार कोटींहून अधिकची बोली लावत स्पर्धेचे प्रायोजकत्व मिळवले होते, ती कंपनी सहजासहजी स्पर्धेच्या प्रायोजकत्वाचा करार वर्षभरासाठी स्थगित करेल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. गलवान खोर्‍यातील संघर्षानंतरही बीसीसीआय आणि कंपनीकडून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता, मग असे काय घडले की, कंपनीने करार स्थगितीचा निर्णय घेतला, असा प्रश्न अनेकांना पडला. याचे कारणही काहीसे तसेच आहे. गलवान खोर्‍यातील संघर्षानंतर भारतीय नागरिकांनी चिनी बनावटीच्या उत्पादनांवर बंदी घालण्यास सुरुवात केली. याचा मोठा परिणाम चिनी कंपन्यांना बसला आहे. चिनी स्मार्टफोनच्या खरेदीकडेही अनेक ग्राहक पाठ फिरवत असल्याने कंपन्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कोरोना संकट काळात आर्थिक घडी सावरण्यासाठी प्रत्येक कंपन्यांना कसरत करावी लागत असतानाच गल्वान खोर्‍यातील संघर्षानंतर नागरिकांनी उत्पादनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती कंपन्यांची झाली आहे. भारतीय नागरिकांची चिनी उत्पादनावर बहिष्कार घालण्याची मानसिकता असताना हजारो कोट्यवधी रुपये कंपनीच्या प्रचारासाठी का वाया घालवायचे, असा प्रश्न कोणत्याही कंपनीचे व्यवस्थापकांना पडणारच. त्यामुळे कंपनीनेच वर्षभरासाठी हा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे क्रिकेट समीक्षकांचे म्हणणे आहे.

एक स्पर्धा साहित्यांच्या हक्कांची!


‘इंडियन प्रीमिअर लीग’ (आयपीएल) स्पर्धेच्या प्रायोजकत्वाचा विषय सर्वत्र चर्चेत असतानाच प्रायोजकाचा दुसरा मुद्दाही सध्या चांगलाच रंगात आला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या क्रिकेट साहित्याचे हक्क मिळवण्याची शर्यतदेखील सध्या स्पोर्ट्स कंपन्यांमध्ये जोरात सुरु झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) २०१६ ते २०२० या कालावधीसाठी ‘नायकी’ या जगप्रख्यात स्पोर्ट्स कंपनीशी ३७० कोटी रुपयांचा करार झाला होता. यात ३० कोटी रुपये स्वामित्व हक्काचाही समावेश होता. मात्र, तो आता संपुष्टात आल्याने क्रिकेट संघाच्या साहित्यांचे हक्क मिळविण्यासाठी अनेक कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. पाच वर्षांसाठीचा नवा करार २०० कोटी रुपये रकमेला म्हणजेच ‘नायकी’च्या करारापेक्षा अतिशय कमी रकमेला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे व्यावसायिक कंपनीतील पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. ‘बीसीसीआय’ने ‘नायकी’समोर आधीच्या करारापेक्षा कमी रकमेचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, तो त्यांनी फेटाळल्याची माहिती आहे. कोरोना संकटामुळे बसलेला आर्थिक फटका लक्षात घेत ‘नायकी’ पुन्हा भारतीय संघाचे क्रिकेट साहित्य करार करण्यात रस दाखवत नसल्याची माहिती आहे, तर ‘बीसीसीआय’च्या प्रस्तावापेक्षा कमी रकमेत त्यांना करार मिळवायचा आहे, असाही मतप्रवाह व्यावसायिक कंपन्यांचा असून भारतीय क्रिकेट संघाचा साहित्याचे हक्क कोण मिळवणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या साहित्याचे हक्क मिळविण्यासाठी ‘प्युमा’या आणखी एका जगप्रसिद्ध कंपनीने एक लाख रुपये खर्च करत अर्ज खरेदी केल्याची माहिती आहे. कोणत्याही कंपनीने निविदा अर्ज खरेदी केला, म्हणजे ते दावेदारी करणार असा अर्थ होत नाही. परंतु ‘प्युमा’ हे हक्क मिळवण्यासाठी उत्सुक असल्याचे जाणवते आहे. ‘आदिदास’सुद्धा हे हक्क मिळवण्यासाठी दावा करणार असल्याचे समजते. ‘प्युमा’ची ३५० विशेष विक्री केंद्रे आहेत, त्या तुलनेत ‘आदिदास’ची ४५० विक्री केंद्रे आहेत. ‘प्युमा’ आणि ‘आदिदास’ या दोन्ही जगप्रसिद्ध कंपनी गेली काही वर्षे विशेषत: ‘इंडियन प्रीमिअर लीग’द्वारे भारतात गुंतवणूक करीत आहे. त्यामुळे येत्या काळात भारतीय क्रिकेट संघाच्या साहित्यांचे हक्क नव्या कंपन्यांकडे जाण्याची शक्यता आहे.

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@