कोरोनावर मात करताच ज्योतिरादित्य शिंदेंनी केले प्लाझ्मा दान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2020
Total Views |

plazma donation_1 &n


नवी दिल्ली:
भाजप नेते व राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुरुवारी प्लाझ्मा दान केले. विशेष म्हणजे कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांना सरकार प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करीत आहेत, ज्यामुळे संक्रमित लोकांच्या उपचारांमध्ये मदत होऊ शकते. ते म्हणाले की देशवासियांच्या जीवाचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात, भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदें आणि त्यांची आई माधवी राजे शिंदे कोरोना संक्रमित असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर दोघेही बरे झाले. शिंदे यांनी प्लाझ्मा दान करतानाचे छायाचित्र ट्विटरवर शेअर केले. ते ट्वीटमध्ये म्हणतात, 'मी आणि माझ्यासारख्या इतर हजारो नागरिकांन जे कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाले, त्यांनी आपला प्लाझ्मा दान करावा आणि इतर संक्रमित लोकांच्या उपचारांसाठी मदत करावी. देशवासियांच्या जीवाचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.' या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना टॅग केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@