कितीही वाईट स्थिती असली तरी आम्ही जनतेला जाऊन भेटणारच! : देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2020
Total Views |
Devendra_1  H x


राजकारणासाठी नाही तर, जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी दौरे; देवेंद्र फडणवीसांचा राज्यसरकारला टोला


जळगाव : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कोविड हॉस्पिटलला भेट दिली. तसेच तेथील रूग्णांची परिस्थितीत जाणून घेत प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशीदेखील संवाद साधला. ‘कितीही वाईट स्थिती असली तरी आम्ही जनतेला जाऊन भेटणारच, त्यांच्या समस्या ऐकणारच’, असे ते यावेळी म्हणाले. देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून, ते प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तिथिल कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत.


जळगाव दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. ‘कुणी जर घरातच बसणार असेल तर आम्ही त्याला काय करणार? जनतेला भेटण्यासाठी कितीही स्थिती वाईट असली तरी आम्ही त्यांना जाऊन भेटणारच,’ असे ते म्हणाले.


राजकारणासाठी आम्ही दौरे करत नाही तर जनतेचे प्रश्न समजवून घेऊन ते सोडवण्यासाठी आम्ही दौरे करत असतो, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच राज्यातले सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असल्याचा पुनरूच्चार त्यांनी यावेळी केला. राज्यातली कोरोनाची परिस्थिती सरकारने व्यवस्थित हाताळली पाहिजे. मात्र सरकारकडून असे होताना दिसत नाहीये. सत्तेमधले तीन पक्ष अनेक कारणांवरून एकमेकांशी भांडत आहेत, हे चांगले चित्र नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@