संरक्षणमंत्र्यांतर्फे सहा पुलांचे उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jul-2020
Total Views |
Rajnath Singh _1 &nb


नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये सीमा रस्ते संस्थानतर्फे सहा पुलांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी मंजूरी दिली आहे. सकाळी व्हीडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे ई-शुभारंभ करण्यात आला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, बीआरओ अध्यक्ष लेफ्टिनेंट जनरल हरपाल सिंह, लष्करप्रमुख एम.एम. नरवाणे यांच्यासह अन्य सैनिक अधिकारी उपस्थित होते. 
सहा पुलांमध्ये ४ पूल अखनूर सेक्टर येथे तर उर्वरित दोन पूल जम्मू-राजपूरा क्षेत्रात असणार आहेत. सहा पुलांसाठी एकूण ४३ कोटींच्या निधीची मंजूरी देण्यात आली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटद्वारे या उद्घाटनाची माहिती दिली. बीआरओद्वारे निर्मित सहा पूलांना मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे पुढील रणनिती आखण्यात तसेच शस्त्रसाठा व अन्य साधन सामग्री पोहोचवण्यात मदत होणार आहे. तसेच सीमावर्ती भागालाही योगदान मिळणार आहे.



@@AUTHORINFO_V1@@