‘राजगृहा’वर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक व्हावी : देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2020
Total Views |

Devendra_1  H x



ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला निषेध 

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृह परिसरातील तोडफोड प्रकरणी नागरिकांमधून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे. भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आरोपींना तत्काळ अटक केले जावे, अशी मागणी केली आहे.


ट्विटरवरून याप्रकरणी बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे. मी स्वतः भीमराव (दादासाहेब) आंबेडकरजी यांच्याशी फोनवर याबाबत चर्चा केली आहे.’







यासोबत अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी देखील केली आहे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.


दरम्यान, मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केला. यात त्यांनी घराबाहेरील सीसीटीव्हीचेही मोठे नुकसान केले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे.




@@AUTHORINFO_V1@@