'स्वतः प्रवीण दरेकर सुरक्षित' ; देवेंद्र फडणवीसांचे ट्वीट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2020
Total Views |

devendra fadnavis_1 



नाशिक :
नाशिक आणि मालेगांवचा दौरा आटोपून जळगावकडे जात असताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील गाडीला किरकोळ अपघात झाला. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला मागून येणाऱ्या ताफ्यातील पोलीस वाहनाने धडक दिली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती दिली.


ते ट्विटमध्ये म्हणतात, "आम्ही जळगावकडे जात असताना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला किरकोळ अपघात झाला. स्वतः प्रवीण दरेकर आणि इतरही सर्वच जण सुरक्षित आहेत.काळजी करण्यासारखे काहीही नाही.", असे म्हणत त्यांनी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर सुरक्षित असल्याची माहिती दिली.


दरम्यान विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला मागून येणाऱ्या ताफ्यातील पोलीस वाहनाने धडक दिली.जळगावनजीक महामार्गावर रात्री ९ वाजता हा अपघात झाला. या वाहनांच्या ताफ्यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील होते. मात्र, ते दुसऱ्य़ा वाहनामध्ये होते. दरेकरांच्या वाहनाला ताफ्यातीलच पोलीस वाहनाची धडक बसली. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही.
@@AUTHORINFO_V1@@