एक शरद, सगळे गारद... मग उद्धवजी पण गारद का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2020
Total Views |

sanjay raut interview_1&n



मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत ११ जुलैपासून वृत्त वाहिन्यांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावरून विरोधी पक्ष भाजपने संजय राऊतांवर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती असताना सत्ताधारी मात्र राजकारण करण्यात मशगुल असल्याची टीका भाजप नेते करत आहे.




दरम्यान आज संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीचा टीझर देखील ट्विट केला आहे. यामध्ये संजय राऊत यांनी एक शरद, सगळे गारद असे म्हटले आहे. मात्र यावरून भाजपाचे नेते नितेश राणे यांनी टोला लगावला आहे. नितेश राणे ट्विट करत म्हणाले की, राऊत म्हणतात एक शरद सगळे गारद, मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पण गारद का ?, तसेच आपल्याच मालकाला, वाह क्या बात असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतांसह उद्धव ठाकरेंनादेखील जबरदस्त टोला लगावला आहे. यापूर्वी भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करत शरद पवार आणि संजय राऊतांच्या मुलाखतीवर निशाणा साधला होता. निलेश राणे म्हणाले की, देश कुठल्या संकटात आहे आणि ह्यांच्या मुलाखती चालू आहेत. इतिहासामध्ये जाऊन काही गोष्टी आत्ता कळल्या तरी त्याचा कोणाला काय उपयोग? लोक चिडली आहेत, इंटरव्यूमध्ये इंटरेस्ट कोणाला नाही. तसेच खरे कौशल्य लढ्यामध्ये असते बोलण्यामध्ये नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.


संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवर या मुलाखती संदर्भातील व्हिडीओचा टीझर टाकला आहे. 'एक शरद, सगळे गारद! महाराष्ट्रातील सत्ता बदल हा अपघात होता काय?' असा मथळा असलेला हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. शरद पवारांची मुलाखत ऐतिहासिक ठरेल. अशी मुलाखत होणे नाही, असा दावा राऊत यांनी केला.

@@AUTHORINFO_V1@@