‘शोले’तील सुरमा भोपाली जगदीप काळाच्या पडद्याआड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2020
Total Views |

Jagdeep_1  H x
 
 
मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते जगदीप यांचे मुंबईमध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीमधून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या अनेक भूमिकांमधून आपली छाप सोडली व रसिकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. रमेश सिप्पी यांच्या सुपरहिट 'शोले' चित्रपटात 'सूरमा भोपाली'ची भूमिका जगदीप यांनी साकारली होती. या भूमिकेने त्यांना एक वेगळी ओळख दिली. जगदीप यांचं मूळ नाव सय्यद इश्तियाक जाफरी असे असून ते अभिनेते जावेद जाफरी यांचे वडील आहेत.
 
 
जगदीप यांची ओळख एक उत्साहाने भरलेला आणि विनोदाचे अचूक टायमिंग असलेला एक सच्चा कलाकार म्हणून होती. २९ मार्च १९३९ रोजी जन्मलेल्या सय्यद इश्तियाक जाफरी यांनी बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटामध्ये पाऊल ठेवले. ब्रह्मचारी चित्रपटात त्यांनी विनोदी भूमिका साकारली आणि आपल्या अभिनयाची छाप सोडली. पुढे ‘जगदीप साब’ म्हणून त्यांनी आपली ओळख हिंदी चित्रपटामध्ये केली. गेल्या ६० वर्षांमध्ये त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. जगदीप यांच्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले.
@@AUTHORINFO_V1@@