प्रत्यक्ष हजेरी लावत ‘मास्टर ब्लास्टर’ने केले प्लाझ्मा डोनेशन सेंटरचे उद्घाटन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2020
Total Views |

Sachin tendulkar_1 &



सेव्हेन हिल्स रुग्णालयातील ‘प्लाझ्मा डोनेशन सेंटर’चे सचिन तेंडुलकरच्या हस्ते उद्घाटन!


मुंबई : सुप्रसिद्ध क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर याने बुधवारी मुंबईतील प्लाझ्मा डोनेशन सेंटरचे उद्घाटन केले. सेव्हन हिल्स रुग्णालयात हे प्लाझ्मा सेंटर सुरू करण्यात आले आहे. या प्रसंगी मीडियाशी बोलताना, ' कोरोनावर मात केलेल्या रूग्णांनी प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान करण्याकरिता पुढे यावे. एक भारतीय दुसर्‍या भारतीयाच्या मदतीसाठी पुढे येणं यापेक्षा सध्या दुसरी कोणतीच मोठी मदत नाही.' असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला.


सध्या अत्यावस्थ कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाच्या जीवाचा धोका कमी करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी वापरली जात आहे. अद्याप जगभरात कोविड१९ वर कोणतेच ठोस औषध, लस नसल्याने अनेकांसाठी प्लाझ्मा थेरपी जीवदान ठरत आहे.


प्लाझ्माथेरपीसाठी कोविड१९ वर मात केलेल्या रूग्णाच्या शरीरात तयार होणार्‍या अ‍ॅन्टी बॉडीज काढल्या जातात. रक्तदानामधून प्लाझ्मा वेगळा केला जातो आणि अत्यावस्थ रूग्णाला तो चढवला जातो. दिवसागणिक मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातही कोरोनाचा रिकव्हरी रेट सुधारत असल्याने मोठ्या प्रमाणात कोरोनावर मात करून घरी परतणार्‍या रूग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वीच ‘प्रोजेक्ट प्लॅटिना' या प्लाझ्मा थेरपी उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले आहे. दरम्यान यामध्ये प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बँक, प्लाझ्मा ट्रायल आणि इमर्जन्सी ऑथरायजेशन या चार सुविधांचा समावेश आहे. या प्रोजेक्टद्वारा उपचार पद्धतीचा सर्वंकष विकास व वापर करून आणि संकलित होणाऱ्या माहितीच्या विश्लेषणातून कोविड विषाणूचे औषध व लस शोधण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.






@@AUTHORINFO_V1@@