ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारोंना कोरोनाची लागण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2020
Total Views |

bolsonaro_1  H



कोरोनाचे वृत्त ‘जाहीर’ करत बोल्सोनारो अडकले नव्या वादात!

ब्रासिलिया : ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांना देखील कोरानाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बोल्सोनारो यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. याच पत्रकार परिषदेत जेअर बोल्सोनारो यांनी एक धक्कादायक कृत्य केले. याप्रकरणी त्यांच्यावर आता जगभरातून टीकेची झोड सुरु झाली आहे.


ब्राझीलच्या अल्वोदरा पॅलेसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोल्सोनारो यांनी चक्क आपला मास्क काढून आपण कोरोना बाधित असल्याचे सांगितले. कोरोनाबाधितांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे, अशा परिस्थितीत एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने अशा प्रकारचे कृत्य करणे बेजबाबदारपणाचे मानले जात आहे.


मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे, मला कोणताही त्रास होत नाही. लक्षणे सौम्य स्वरुपाची आहेत, असे बोल्सोनारो यांनी म्हटले आहे. त्याआधी कोरोना हा एक सौम्य स्वरुपाचा फ्ल्यू असल्याचे त्यांनी म्हटले होते, त्यानंतरही त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत ब्राझीलचा जगात दुसरा नंबर लागतो. जवळपास १६ लाख जणांना कोरोनाची लागण झाली असून ६० हजार जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे.
@@AUTHORINFO_V1@@