अमेरिकाही चीनवर डिजिटल स्ट्राईक करण्याच्या तयारीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2020
Total Views |

USA _1  H x W:


वॉशिंग्टन :
भारताकडून चीनवर डिजिटल स्ट्राइक केल्यानंतर आता अमेरिकादेखील आपल्या देशात काही चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा विचार करीत आहे. तसे संकेत अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांनी दिले आहेत. चीनला मोठा आर्थिक झटका देण्यासाठी आता अमेरिकादेखील भारताच्या पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता आहे.



परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ म्हणाले की आम्ही चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या विचारात आहोत. ऑस्ट्रेलियामध्येही चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे लवकरच चीनला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. एकट्या भारतातल्या बंदीमुळे टिकटॉकला जवळपास ६ अब्ज डॉलर्सचे नुकसान होत आहे. यामध्ये आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


लडाखमध्ये भारत आणि चिनी सैन्यामधील वाढती तणाव लक्षात घेता भारताने चीनच्या अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर भारतीय अ‍ॅप्स मोठ्या प्रमाणावर डाउनलोड करण्यात आले. टिक-टॉक ऐवजी चिंगारी आणि धकधक, कॅमस्केनर ऐवजी स्कॅन अ‍ॅप आणि शेअर इट ऐवजी चॅट शेअरसारख्या अँप्सना पसंती मिळाली. चिनी अ‍ॅप देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक असल्याचं म्हणत भारत सरकारनं चिनी अ‍ॅपवर बंदी घातली. त्यामुळे चिनी कंपन्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. आम्ही भारतीय वापरकर्त्यांची माहिती चीन सरकारला देत नसल्याचं स्पष्टीकरण चिनी कंपन्यांनी दिलं आहे. चीन सरकारनं कधीही वापरकर्त्यांचा तपशील मागितला नसल्याचं टिकटॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन मेयर यांनी भारत सरकारला लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.
@@AUTHORINFO_V1@@